Breaking Ticker

परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टी येथे प्लेसमेंट सेल अंतर्गत सन 2025-26 मध्ये 368 विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये ऐतिहासिक निवड.

 



श्रीगोंदा प्रतिनिधी :- .अशोक बी. राहिंज 


       श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्ट चे परिक्रमा शैक्षणिक संकुलातील परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत आहे, येथील शिक्षणाचा दर्जा, उत्कृष्ठ वसतिगृह तसेच इतर असणाऱ्या सुविधा त्यामुळे महाराष्ट्रातून विद्यार्थी विद्यार्थिनी येथे शिक्षणासाठी प्रवेश घेत आहेत, त्यातच या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची यशोगाथा कायम राखली आहे.

      या इव्हेंट मध्ये एस.पी.एम.ऑटोकोम सिस्टिम प्रा. लि. रांजणगाव, जाबिल सर्किट इंडिया प्रा.लि., झेड एफ स्टेरिंग केअर इंडिया प्रा. लि., फियाट इंडिया ऑटोमोबाईल प्रा.लि., सिएट येडूसेस प्रा. लि., जॉन डीअर इंडिया प्रा.लि.शिक्रापूर, टाटा ऑटोकॉम्प सिस्टीम प्रा. लि., बजाज ऑटो प्रा.लि.चाकण, मायक्रोटेक डेव्हलपर लि., आर पी जी प्रा.लि., जनरल इंडस्ट्रियल कंट्रोल प्रा.लि. इत्यादी कंपन्यांमार्फत महाविद्यालयात भव्य प्लेसमेंट इव्हेंट उत्साहात पार पडला.यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या मुलाखती घेऊन परिक्रमा तंत्रनिकेतनचे 368 विद्यार्थ्यांची निवड झाली असून ही संस्था व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अभिमानाची व ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

     विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण परिश्रम तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे यश संपादन केले आहे. हे यश संस्थेच्या दर्जेदार शिक्षण पद्धतीचे आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे द्योतक आहे.

     परिक्रमा तंत्रनिकेतन काष्टी संस्थेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की दर्जेदार शिक्षण व योग्य मार्गदर्शन मिळाल्यास विद्यार्थी नक्कीच यशाच्या शिखरावर पोहोचू शकतात.

        या सर्व विद्यार्थ्यांचे बबनरावजी पाचपुते विचारधारा ट्रस्टचे संस्थापक माजी मंत्री बबनरावजी (दादा) पाचपुते, संस्थेच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई बबनरावजी पाचपुते, सचिव पाचपुते, अधिकारी. आमदार विक्रमसिंह मुख्य कार्यकारी अॅड. प्रतापसिंह पाचपुते, अॅकॅडेमिक डायरेक्टर. सौ. इंद्रायणी प्रतापसिंह पाचपुते, मुख्य प्रशासकीय अधिकारी व अतिरीक्त कार्यकारी अधिकारी अनिल पुंड सर, डेप्युटी  अॅकॅडेमिक डायरेक्टर डॉ. संजीव कदमपाटील सर तसेच परिक्रमा तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत सूर्यवंशी सर, इंजिनिअरिंग प्राचार्य डॉ. मोहन धगाटे सर, बी. फार्मसी प्राचार्य डॉ. सुनिल निर्मळ सर, एमबीए डायरेक्टर डॉ. सुदर्शन गिरमकर, सायन्स प्राचार्य डॉ. पी. ए. इथापे सर, व डी. फार्मसी प्राचार्य डॉ. आर. शिंदे सर तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी आर.के. धेंडे सर,प्रा.भूषण तोंडे, प्रा.अश्वमेध भोसले, प्रा.राकेश मुळे, प्रा.योगिता काळाने व अल्युमनी सेल प्रा. प्रतिक्षा ओव्हाळ, प्रा.प्रियंका ब्राम्हणेकर,प्रा. वैष्णवी लांडे,प्रा.भूषण पाचपुते व सर्व विभाग प्रमुख व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

     या विद्यार्थ्यांच्या निवडीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तसेच विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांचे कौतुक होत आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.