Breaking Ticker

पी. एम. श्री सोनाळा शाळेत विज्ञान प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद




संग्रामपूर प्रतिनिधी सुमेध दामधर 


सोनाळा (०१ मार्च २०२६): दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोज शनिवार ला राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त C. V. Raman यांच्या जयंतीचे औचित्य साधून पी. एम. श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा, सोनाळा येथे भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगांची आकर्षक मांडणी व सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. या विज्ञान प्रदर्शनीमध्ये सुमारे ५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील प्रयोग सादर केले. विद्यार्थ्यांनी विज्ञानातील संकल्पना प्रत्यक्ष प्रयोगांद्वारे स्पष्ट करत आपली जिज्ञासा व सर्जनशीलता प्रभावीपणे दाखवून दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन सोनाळा ग्रामपंचायत चे प्रशासक श्री हर्षलजी खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमुख श्री भीमरावजी वानखडे सर तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ श्री चंद्रप्रकाश कडू सर उपस्थित होते. मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगांची पाहणी करून त्यांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले.

याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी बोपटे मॅडम म्हणाल्या, "विज्ञान हा केवळ विषय नसून तो विचार करण्याची पद्धत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, जिज्ञासा आणि आत्मविश्वास वाढीस लागतो." तर केंद्रप्रमुख श्री वानखडे सर म्हणाले, "ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही विज्ञानाबद्दल प्रचंड क्षमता आहे. योग्य मार्गदर्शन व संधी मिळाल्यास हे विद्यार्थी निश्चितच भविष्यात मोठे वैज्ञानिक बनू शकतात." ही विज्ञान प्रदर्शनी विज्ञान शिक्षक श्री निलेश घाटोळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. तसेच सोनाजी महाराज हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनीला भेट देऊन विविध प्रयोगांचा आनंद घेतला. मान्यवरांच्या हस्ते सहभागी विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निलेश तायडे सर यांनी केले. तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात हा विज्ञान प्रदर्शनीचा सोहळा पार पडला असून, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.