स्वप्नील घोटेकार ग्रामीण प्रतिनिधी गुजरी
राष्ट्रसंत तूकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास व सन्मान संस्था महाराष्ट्र राज्य शाखा तालूका कळंब च्या वतीने आयोजीत कलावंत मार्गदर्शन मेळावा आणि तालूकाभर राष्ट्रसंताच्या पावन स्पर्शाने पूणीत चरण पादूकासह रथयात्रेचा प्रारंभ सोहळा स्थानीक भवानी मंगल कार्यालयामधे कलावंतांच्या भव्य ऊपस्थितीमधे संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डाॅ.सूर्यप्रकाशजी जयस्वाल, अध्यक्ष मानवता मंदीर यवतमाळ , ऊदघाटक माजी जि.प.यवतमाळ अध्यक्ष तथा मूंबई बाजार समितीचे संचालक प्रविणभाऊ देशमूख होते ,प्रमूख मार्गदर्शक कलावंत समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.श्याम खंडारे, विजयराव ईंगोले,न.प.कळंब बांधकाम समिती सभापती चंद्रशेखरजी चांदोरे,कळंब तालूका बाजार समितीचे संचालक आनंदराव जगताप,कलावंत समितीचे कार्याध्यक्ष मूरलीधर धनरे,प्रबोधनकार रमेश वाघमारे,हंसराज तलवारे ,नानाजी सिडाम,शारदाताई आत्राम मंचकावर ऊपस्थित होते.या प्रसंगी प्रविण भाऊ देशमूख,अरूणराव सालोडकर,वसंतराव जवादे ह्यांना राष्ट्रसंत जिवन गौरव पूरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रसंत तूकडोजी महाराज व संत गाडगे बाबा ह्यांचे राष्ट्र ऊभारणी मधील मोलाचे कार्य तथा मानवता,देशभक्ती व बंधूभाव जागविण्यासाठी देशपातळीवरील अतूलनीय कार्याची दखल घेवून त्यांना भारत रत्न पूरस्काराने सन्मानीत करण्यासाठी शासनाने केंद्र सरकाला शिफारीश करावी ह्या मागणी साठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यातून एक लाख सह्याचे निवेदन अभियानाचा प्रारंभ आज ह्या सभेतून करण्यात येत असल्याचे ॲड.श्याम खंडारे ह्यांनी घोषीत केले. कलावंतांचे विधायक प्रश्न सोडविण्यासाठी आपण शासन दरबारी पाठपूरावा करणार असल्याची ग्वाही प्रवीण देशमूख ह्यांनी दिली.
कार्यक्रमाचे मूख्य आयोजक गंगाधर घोटेकर ,मारोतराव आत्राम, तालूक्यातील समस्त कलावंत समितीच्या पदाधिका-यांचा सन्मान करण्यात आला. रमेशभाऊ वाघमारे व हंसराज तलवारे ह्यांच्या गायन प्रबोधनाने ऊपस्थित मंत्रमूग्ध झाले संचलन गंगाधरजी घोटेकर , प्रास्ताविक सूधीरभाऊ चौधरी व आभार मूरलीधर धनरे ह्यांनी मानले.कार्यक्रमाला तालूक्याच्या गावखेड्यातून मोठ्या संख्येनी कलावंत वारकरी ऊपस्थित होते.
