Breaking Ticker

काथर्दे खुर्द येथे एप्रिल फुल ऐवजी एप्रिल कुल साठी वृक्षारोपण व चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न...



शहादा प्रतिनिधी 

       तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काथर्दा खुर्द येथे एप्रिल फुल ऐवजी एप्रिल कूल साठी साने गुरुजी मित्र मंडळातर्फे  वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचा सर्व प्रथम साने गुरुजीचें प्रतिमा पूजन करण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा प्राचार्य संजय पटेल,  शैलेजा पटेल ,आशा चौधरी,साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी, सचिव गुलाबराव पवार, , शाळा व्यस्थापन समिती अध्यक्षा गौरी वळवी, पोलिस पाटील ईश्वर वळवी, उपसरपंच गणेश वळवी सदस्य  मुख्याध्यापक विजय सोनवणे,तुकाराम अलट आदी उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षाचे चित्र व त्याची  फायदे  लिहून 47 विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धात भाग घेतला  त्यात प्रथम भुमी ईश्वर वळवी द्वितीय सेजल खंड्या मोरे तृतीय दुर्गेश्वरी गोपाल माळी आणि उत्तेजनार्थ परी रविंद्र कोळी, वैष्णवी अनिल कोळी या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व बक्षिसे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात संजय पटेल व गुलाबराव पवार यांनी मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाच्या प्रास्ताविक माणक चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन तुकाराम अलट व आभार विजय सोनवणे यांनी मांडले  यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक श्रीकांत वसईकर, शारदा कडवे,सुभाष कोळी, रमेश वडर, संगिता पाडवी, रेखा पटेल यांनी मेहनत घेतली.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.