पुणे जिल्हा प्रतिनिधी - उमेश जोशी
सविस्तर - नाथ संप्रदायाचे महान संत, ब्रह्मीभूत श्रीमद् सद्गुरू पांडुरंग नाथ महाराज जगताप यांचे पणतू , श्री. ऋषिकेश विजय जगताप यांना आकाशवाणीची बी हाय ग्रेड तबला वादन यामध्ये प्राप्त झाली. ऋषिकेश जगताप हे अनेक मान्यवर कलाकारांना साथ संगत करत असतात तसेच सांस्कृतिक वाद्यकलाक्षेत्रात विशेष योगदान असून याशिवाय स्वतंत्र तबला वादन करत असतात. देश विदेशांत तबला वादन क्षेत्रात त्यांनी नाव कमावले आहे.
पंडित विजय बक्षी पंडित राजेंद्र कुलकर्णी , पंडित रघुनंदन पणशीकर पंडित , पंडित उल्हास कशाळकर , पंडित सुधीर नायक , पंडित शौनक अभिषेकीं, पंडित जयतीर्थ मेवुंडी, उस्ताद शाकीर खान , अभिषेक बोरकर, निनाद दैठणकर , अयान सेन गुप्ता आदी अनेक मान्यवर कलाकारांना ते नेहमी साथ करत असतात.
सन २०२४ चा राज्य सरकार द्वारा देण्यात येणारा, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार श्री ऋषिकेश यांना प्राप्त झाला, सन २०२६ मधे ऑल इंडिया रेडिओ चे ते ग्रेडेड आर्टिस्ट झाले. या दोन्ही बहुमानाच्या प्राप्तीने ऋषिकेश यांनी आपल्या कुळाचा मान वाढवला आहे आणि शिवाय आपले गाव मारणेवाडी तालुका मुळशी चे सांस्कृतीक वैभवात भर घातली आहे.
ऋषिकेश आपले काका श्री जानकीराम जगताप यांच्या ज्ञान दानाच्या क्षेत्रात हातभार लावतात व अनेक विद्यार्थ्यांना तबला शिकवतात कोणतीही फी न आकारता संगीत प्रसारार्थ हे काम ते आवडीने आणि श्रध्देने करतात.ऋषिकेश यांच्या भावी सांगीतिक सांस्कृतिक कार्यास शुभेच्छा.
