Breaking Ticker

सायखेडा शिवारात शेतातील बाभळीची झाडे तोडून विकल्याचा आरोप; शेतकऱ्याची पोलिसांत तक्रार


शेतमालकाची पूर्वपरवानगी न घेता झाडांची तोड केल्याचा दावा; चौकशी करून सहकार्य करण्याची नागनाथ तुपकर यांची मागणी

सोनपेठ, प्रतिनिधी : शिवशंकर तुपकर दि. 27-10-26  सोनपेठ तालुक्यातील सायखेडा शिवारातील गट क्रमांक १० मधील शेतात असलेली बाभळीची मोठी झाडे परस्पर तोडून विकल्याचा आरोप शेतकरी नागनाथ निवृत्ती आप्पा तुपकर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी सोनपेठ पोलीस ठाण्याच्या उपपोलीस निरीक्षकांकडे लेखी अर्ज देऊन योग्य चौकशी करण्याची मागणी केली आहे.

तुपकर यांनी दिलेल्या अर्जानुसार, सायखेडा शिवारातील गट क्रमांक १० मध्ये त्यांची स्वतःच्या मालकीची शेती आहे. या शेतात बाभळीची मोठी झाडे होती. मात्र, त्यांच्या म्हणण्यानुसार, शेजारील पंडित भोजा राठोड यांनी शेतातील बाभळीची तसेच इतर झाडांची परस्पर तोड करून विक्री केली. या व्यवहाराबाबत आपल्याला कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती, असेही तुपकर यांनी अर्जात नमूद केले आहे.

झाडे तोडून टेम्पोत भरत असताना प्रकार उघडकीस तक्रारदार नागनाथ तुपकर यांच्या म्हणण्यानुसार, ते शेतात गेले असता सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शेतातील झाडे तोडून त्यांचे लाकूड मोठ्या टेम्पोत भरले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी संबंधित व्यक्तींना विचारणा केली असता, झाडांची विक्री पंडित भोजा राठोड यांनी केल्याची माहिती मिळाल्याचे त्यांनी अर्जात म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.