Breaking Ticker

70 रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार मोफत औषधे



प्रतिनिधी शहादा

जागतिक महिला दिनानिमित्त जायंट्स ग्रुप ऑफ शहादा सहेली व संकल्प नारी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 9 मार्च 2026 रोजी महिलांसाठी महावीर हॉस्पिटल मध्ये जायंट्स सहेली डॉक्टर स्मिता जैन यांचे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर दुपारी 2 ते रात्री 8 या वेळेत घेण्यात आले.एकूण 70 रुग्णांची तपासणी करून मोफत उपचार मोफत औषधे देण्यात आली.

          विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ.प्रीती ताई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जायंट्स अध्यक्षा सौ.रेखा पटेल , जायंट्स सहेली सौ. आशा चौधरी, सौ योगिता वाल्हे,सौ. अल्का जोंधळे, सौ.पूनम सोनार , जायंट्स फेडरेशन2अ चे कोषाध्यक्ष श्री मानक भाई चौधरी, जायंट्स अध्यक्ष भरत भाई पटेल. संकल्प नारी ग्रुपचे अध्यक्षा राधिका सोनार,नगरसेविका, भारती चव्हाण,मोना कोचर, पुनम सोनार संकल्प ग्रुप सदस्य राकेश कोचर उपस्थित होते. याप्रसंगी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्षा सौ प्रीती ताई अभिजीत पाटील, डॉक्टर स्मिता जैन, डॉक्टर राजेश जैन यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले सौ. रेखा पटेल यांनी सूत्रसंचालन केले. फेडरेशन टू अ चे कोषाध्यक्ष मानक भाई यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.