शहादा – आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जितो लेडीज विंग शाहादा यांच्या वतीने कॅन्सर व थॅलेसेमिया या आजारांबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने वॉकाथॉन व कार ड्राइव्ह रॅलीचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम श्री महावीर इंग्लिश मीडियम स्कूल, शाहादा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन कन्व्हिनर श्रीमती रूपाली गेलडा व को-कन्व्हिनर श्रीमती रूपाली कोचर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. समाजामध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करणे तसेच वेळेवर तपासणीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.कार्यक्रमासाठी श्री महावीर इंग्लिश मीडियम स्कूल यांचे विशेष सहकार्य व प्रायोजन लाभले. शाळेचे प्राचार्य ए. एम. पाटील, स्पोर्ट्स टीचर तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
या जनजागृती मोहिमेअंतर्गत १० कारांची कार ड्राइव्ह रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सदस्यांनी उत्साहाने सहभागी होत कॅन्सर व थॅलेसेमिया विषयी समाजात जागरूकता निर्माण करण्याचा संदेश दिला.कार्यक्रमानंतर शाळा समितीच्या वतीने सर्व सहभागींसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली. या प्रकल्पात जितो लेडीज विंग शाहादाच्या एकूण ३१ महिला सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेक्रेटरी श्रीमती प्रतिभा गेलडा, ट्रेझरर श्रीमती प्रियंका कोटाडिया, कविता संचेती, लक्ष्मी गेलडा, प्रीती लुनिया, साधना गेलडा, तृप्ती गेलडा, डॉ. स्मिता जैन, कुसुम गेलडा, राखी गेलडा, विभा गेलडा, ममता कोटाडिया, पूजा देसर्डा, पूजा कोटाडिया, गुंजन कोटाडिया, भारती कोटाडिया, करुणा कोटाडिया, नीतू बागरेचा, दिव्या संचेती, सुवर्णा चोपडा, प्रियंका चोपडा, प्रतीक्षा चोपडा, पूजा नहाटा, सोनू नहाटा, मनीषा खिवंसरा, स्वीटी छाजेड, नेहा गेलडा तसेच कल्पना चोरडिया यांचे विशेष सहकार्य लाभले.
सर्वांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला आणि महिला दिनाच्या निमित्ताने समाजात आरोग्याबाबत सकारात्मक व जागरूकतेचा संदेश देण्यात आला.
