Breaking Ticker

स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र रँक 38 तसेच ओबीसी संवर्गातून सतरावा मयूर पाटील यांची निवड

 


प्रतिनिधी शहादा 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्र रँक 38 तसेच ओबीसी संवर्गातून सतरावा क्रमांक प्राप्त करून पोलीस उपनिरीक्षक पदासाठी उल्लेखनीय यश संपादन केल्याबाबत वैजाली ता.शहादा येथील चिरंजीव मयूर मंगेशराव पाटील यांची निवड झाल्याबाबत ग्रामस्थ मित्रपरिवार यांच्यातर्फे सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.

         यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्रीराम पाटील होते तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक ह.भ.प.बबनराव मुंजुगले ज्येष्ठ नागरिक व विकास, सोसयटीचे माजी चेअरमन भीमराव पाटील ,शंकरराव पाटील ह.भ.प.बाळू महाराज औसरेकर पुणे, ह.भ.प.नारायण महाराज पाटील, माजी सरपंच पंकज पाटील विनोद पाटील बुधा पाटील श्रीमती वत्सलाबाई पाटील सेवानिवृत्त पोस्ट मास्तर इंदुबाई पाटील सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका मोतन बाई पाटील बुंदलेश्वर आश्रम शाळा सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल चव्हाण तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संजय पाटील व ग्रामस्थ तरुण कार्यकर्ते उपस्थित होते वैजाली येथील रहिवासी व शहादा तालुक्यातील टवळाई जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मंगेशराव माणिक पाटील व सौ.वंदना पाटील यांचे चिरंजीव मयूर पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबाबत ग्रामस्थ नातेवाईक व मित्रपरिवार यांच्यावतीने सत्कार समारंभाचे आयोजन गावातील मारुती मंदिराच्या प्रांगणात करण्यात आले यावेळी त्यांचे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येऊन गौरवण्यात आले यावेळी बबनराव मंजूगले माध्यमिक शिक्षक प्रशांत पाटील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अनिल चव्हाण श्रीराम पाटील संजय पाटील मंगेश पाटील व मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेंद्र साळुंखे शिवाजी पाटील संजय साळुंखे लक्ष्मीकांत पाटील प्रफुल पाटील मंगेश बहिरम न्हानु पाटील दिलीप साळुंखे राकेश पाटील अशोक पाटील चंद्रकांत पाटील विशाल पाटील नंदकिशोर पाटील जगदीश पाटील अरुण पाटील दिलीप पाटील मुकेश पाटील समाधान पाटील भटूचव्हाण प्रशांत पाटील श्याम पाटील प्रवीण पाटील भटू पाटील निर्मल पाटील सौ पुष्पाबाई पाटील भिकुबाई पाटील केवळ बाई पाटील तसेच हरिपाठ भजनी मंडळाचे सदस्य व श्री.छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ चे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार संजय पाटील यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.