Breaking Ticker

पूज्य साने गुरुजी महाविद्यालयात ‘Intellectual Property Rights’ विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न




शहादा : पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा येथे IQAC विभाग, इंग्रजी विभाग, रसायनशास्त्र विभाग व मानवनीती विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘बौद्धिक संपदा हक्क (IPR)’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून नंदुरबार येथील लॉ कॉलेज चे प्राचार्य डॉ. नितेश चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पटेल होते. आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. नितेश चौधरी यांनी बौद्धिक संपदा हक्कांचे महत्त्व, संशोधन व नवकल्पनांमध्ये IPR चे स्थान तसेच पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, डिझाईन आणि भौगोलिक संकेत यांसारख्या विविध घटकांबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. आजच्या ज्ञानाधारित आणि स्पर्धात्मक युगात संशोधन, नवनिर्मिती आणि सर्जनशीलतेचे संरक्षण करण्यासाठी बौद्धिक संपदा हक्क अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी संशोधन व नवकल्पनांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य करावे तसेच आपल्या कल्पनांचे कायदेशीर संरक्षण करण्यासाठी IPR विषयी योग्य माहिती असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना IPR विषयाची सखोल समज प्राप्त झाली. रसायनशास्त्र विभाग प्रमुख व IQAC समन्वयक डॉ. मिलिंद पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात संशोधन व नवकल्पनांचे संरक्षण करण्यासाठी IPR अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रकारचे व्याख्यान विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी उपयुक्त ठरतात, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी विद्यार्थ्यांनी संशोधन, नवकल्पना आणि बौद्धिक संपदा हक्क याबाबत जागरूक राहण्याची गरज अधोरेखित केली. उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक दृष्टीकोन विकसित करणे, नव्या कल्पनांना प्रोत्साहन देणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी उपलब्ध असलेल्या कायदेशीर प्रक्रियांची माहिती करून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सदर कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. एम. के. पटेल, उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर तसेच श्री. सुनील भांडारकर यांचे मार्गदर्शन लाभले. पूज्य सानेगुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक प्रा. मकरंद पाटील तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मयूर पाटील,उपप्राचार्य डॉ. एस. डी. सिंदखेडकर,श्री. सुनील भांडारकर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वजीह अशहर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित विभागातील प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच या उपक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा.दीपक भाई पाटील, उपाध्यक्ष मा. जगदीशभाई पाटील, समन्वयक प्रा.मकरंद पाटील, मानद सचिव कमलताई पाटील व संचालक मयुर पाटील यांचे मार्गदर्शन व शुभेच्छा लाभल्या.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.