Breaking Ticker

नगरपरिषदेच्या निकालानंतर नागरिकांमध्ये विकास कामाबद्दल प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली

 


प्रतिनिधी शहादा          

         नगरपरिषदेच्या निकालानंतर नागरिकांमध्ये विकास कामाबद्दल प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. नगरपालिकेच्या कुठलाही निधी परत जाणार नाही असे प्रतिपादन पत्रकार परिषदेत लोक नियुक्त नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले 

          सद्य परिस्थितीत शहादे शहरात चर्चिला जाणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे अल्पसंख्यांक निधी परत जाणार आहे यासाठी मी पत्रकार परिषद बोलावली आहे. एकूण चार कोटी सदोतीस लाखाच्या अल्पसंख्यांक निधी कामाच्या यादीसह पारित झाला असून केवळ समन्वयाच्या अभावाने काम तात्पुरत्या स्वरूपात थांबलेले आहे. नगरपालिका बांधकाम विभाग सक्षम असल्याने व नगरपालिका येणारी काम ही केवळ नगर पालिकेच्या माध्यमातून व्हावी असा आग्रह माझ्या आहे जेणेकरून त्या निधीमधून शहादा शहर विकासाचे कामे चांगल्या पद्धतीने होतील. नगरपालिकेची निवडणूक ही चुरशीची झाली आहे त्यामुळे मते जुळायला थोडा वेळ लागेल जो विकासाच्या अजेंडा शहर विकासासाठी मांडण्यात आला होता त्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत निधी परत जाणार नाही याबद्दल आपण सर्वजण निश्चिंत रहा. शहरासाठी मूलभूत समस्या म्हणजे भूमिगत गटारी, डास निर्मूलन, घनकचरा व्यवस्थापन या विषयावर देखील त्यांनी प्रकर्षाने आपली मत मांडली. पंधरावा वित्त आयोग यांच्या निधी प्राप्त झालेल्या नाही त्यामुळे संपूर्ण भार नगरपालिकेच्या निधीवर आला आहे निधी अभावी बिले ठेकेदाराला देण्यात आली नाहीत आता अनुशासनाकडून पैसे यायला सुरुवात झाली आहे सध्याच्या ठेकेदाराला एक महिन्याची मुदत वाढ दिली आहे जास्तीत जास्त निधी कसा येईल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहोत. शहादा शहराच्या विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. व निवडणुकीपूर्वी केलेल्या जाहीरनाम्याप्रमाणे मी काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील असे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.