Breaking Ticker

बेटी बचाव बेटी पढाव जनजागृती पर कार्यक्रम

 


प्रतिनिधी शहादा 

       नगरपरिषदेच्या महिला बालकल्याण समितीच्या वतीने बेटी बचाव बेटी पढाव जनजागृती पर कार्यक्रम आणि रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या मंगळवारी पार पडलेल्या या कार्यक्रमांतर्गत स्त्रीभ्रूणहत्या रोखणे आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले 

     शहादा नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक टाऊन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला या उपनगराध्यक्ष माधवी पाटील महिला बालकल्याण समिती सभापती गंगा ठाकरे नगरसेविका भारतीबाई नाईक लताबाई शिवदे दक्षता पाटील रूपाली पवार आणि भारती चव्हाण उपस्थित होत्या डॉक्टर स्मिता जैन यांनी श्री गुरुनाथ यासारख्या सामाजिक प्रश्नावर विस्तृत आणि प्रभावी मार्गदर्शन केले ज्योती पाठक यांनी बेटी बचाव बेटी पढाव अभियानासह महिला व बालविकास विभागाच्या शासकीय योजनांची माहिती दिली. एडवोकेट सीमा खात्री यांनी महिलांना कायद्यातील तरतुदी आणि त्यांच्या कधी जाणीव करून दिले सूत्रसंचालन प्राध्यापक सुजाता पाटील यांनी केले प्रभाकर सोनार अंजना मगरी उमेश सोलंकी रूपाली चव्हाण आणि महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. 

      यावेळी श्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ घेण्यात आली. रांगोळी स्पर्धेत परिसरातील 24 महिला व विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला मुलगी वाचवा मुलगी शिकवा आणि महिला सक्षमीकरण अशा विविध सामाजिक विषयावर आधारित अतिशय सुंदर आणि बोलक्या रांगोळ्या यावेळी साकारण्यात आल्या होत्या रांगोळी स्पर्धेत हस्ती रमेश पटेल हिने केलेल्या प्रथम रचना पुरुषोत्तम शिवदे द्वितीय तर भाग्यश्री जगन ढोले यांना तृतीय पारितोषिक देण्यात आले याप्रसंगी माधवी पाटील यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमात कल्पना वळवी ह्या पॅरामेडिकल स्टाफ म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमात महिलांनी बेटी बचाव बेटी पढाव आणि स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी सामूहिक शपथ घेतली

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.