Breaking Ticker

जि.प.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी कृष्णा पोफळे तर उपाध्यक्षपदी इरफाना शहा यांची निवड

  


मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी प्रातिनिधि 

खुलताबाद तालुक्यातील गोळेगाव येथे शालेय व्यवस्थापन समितीची निवड दिनांक २८ एप्रिल २०२६ मंगळवारी रोजी पार पडली. या निवडीसाठी शाळेतील काही शिक्षक वृंद व गावातील काही ठराविक ग्रामस्थांचीच उपस्थितीती होती. कारण गावातील काही ठाराविक ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी हे संगणमत करून आर्थिक व इतर व्यवहार करतात. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोळेगाव येथील शाळेमध्ये काही अनुचित प्रकार व घटना घडल्यास ग्रामपंचायत कार्यालयात येऊन त्या घटनेविषयी गावकऱ्यांना ग्रामस्थांना माहिती होण्यासाठी अलाउसिंग करतात परंतु असे काही कामे असल्यास ते ठराविक व त्यांच्याशी निगडित असलेल्या लोकांना विश्वासात घेऊन अशा पध्दतीने कामे यशस्वीपणे पार पाडतात. परंतु शिक्षणाच्या बाबतीत ही काही दळभद्री हे राजकारण करत असल्याचा उपस्थितांना आला. शाळा ही गावांसाठी असावी व गाव हे शाळेसाठी असावे ही म्हण काहींनी अगदी आपल्या कलुषित बुध्दीच्या जोरावर मात करत, षडयंत्र रचवत असा प्रकार घडवून आणला जात आहे. 

शालेय व्यवस्थापन समिती निवड करतांना सर्व पालकांना नोटीस सुचना दिल्याचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी सांगितले पण त्याही व्यतिरिक्त गावात शिक्षणाची आवड असलेले, समाजसेवक, कार्यकर्ते, पत्रकार, आजी माजी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष/उपाध्यक्ष व सदस्य यांचा विचार करणे देखील आवश्यक असताना त्यांना डावलून अशा पद्धतीने काही महाभागांच्च्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. ज्यांनी ज्यांनी अगोदर शाळेसाठी आपले योगदान दिले त्यांना डावलने हे योग्य नसल्याचेही काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी कृष्ण पोफळे तर उपाध्यक्षपदी इरफाना शहा यांची ठराविक ग्रामस्थांचीच उपस्थितीती प्रत्यय यावेळी निवड करण्यात आली. समितीच्या सदस्य पदी विलास सोनवणे, पुंडलिक गोल्हार, संतोष कछवा, बाबासाहेब औटे, कारभारी आढाव, सरला औटे, अंजली साळवे, जयश्री व्यवहारे, अनिता तांदळे, स्वाती पोफळे यांची निवड करण्यात आली तर शिक्षण तज्ञ म्हणून निवडणुकीद्वारे (चिठ्ठी मतदान प्रक्रिया) रेवजीनाथ औटे यांना २९ मते तर गणेश तांदळे यांना २८ मते पडल्याने अवघ्या एका मताने गणेश तांदळे यांचा निसटता पराभव होऊन विजयाची माळ रेवजीनाथ औटे यांच्या गळ्यात पडली व त्यांची शिक्षण तज्ञ पदी वर्णी लागली. तसेच या नवनियुक्त शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष व उपाध्यक्ष सह सर्व सदस्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी गोळेगावचे पोलीस पाटील

आजिनाथ जाधव, अक्रम शेठ, गणेश कराळे, कडुबा तांदळे, शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष निवृत्ती जिते, हरिभाऊ म्हसकर, नंदू गोल्हार, अक्षय साळुंके, अमोल देहाडे, अंकुश त्रिभुवन, रवि गायकवाड, आकाश मोरे, नवनाथ पोफळे, संतोष कुबेर, योगेश शेळके, सोमीनाथ पोफळे युवा उद्योजक नदीम बेग, अशोक चौधरी, विजय पट्टीवाले, रवि जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ-पालक मंडळी, शिक्षक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.