प्रतीणीधी मुनीर शाह
खुलताबाद : तालुक्यातील लोणी येथील सरपंचपदासाठी झालेल्यापोटनिवडणुकीत गणेश दादाराव ठोंबरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार मुनीर मन्नान शहा यांचा १६५ मतांनी पराभव करीत विजय मिळविला आहे.
लोणी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद ओबीसीसाठी राखीव असून या व सर्वसाधारण महिला पदाच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. बुधवारी खुलताबाद तहसील कार्यालयात तहसीलदार संतोष गुट्टे, नायब तहसीलदार अविनाश नीळेकर, मंगेशशिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या मतमोजणीमध्ये सरपंचपदासाठी गणेश दादाराव ठोंबरे यांना ८६८ तर प्रतिस्पर्धी मुनीर मन्नान शहा यांना ७०३ मते मिळाली. सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत गणेश ठोंबरे यांनी १६५ मतांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळविला. तर, सर्वसाधारण महिलेच्या एका जागेवर अरुणा बाबासाहेब दांडेकर (२७४) यांनी विजय मिळविला. त्यांनी छबाबाई रुस्तुम दांडेकर यांचा पराभव केला. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला.
गावांतील रिक्त ५ सरपंच व १४ सदस्यपदांच्या पोटनिवडणुकीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान पार पडले होते. २९ एप्रिल रोजी निकाल जाहीर करण्यात आला. यापूर्वीच सरपंचपदाच्या एक व सदस्याच्या २३ जागा बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या.
