Breaking Ticker

निजामुद्दीन औलिया दर्ग्याचे सज्जादा नशीन सय्यद फरीद अहमद निजामी खुलताबाद भेटीवर; दर्गा कमिटींकडून स्वागत



मुनीर अब्बास शाहबाजार सावंगी प्रातीनीधी 2/5/26

हजरत निजामुद्दीन औलिया (दिल्ली) येथील दर्ग्याचे सज्जादा नशीन सय्यद फरीद अहमद निजामी यांचे नुकतेच ऐतिहासिक शहर खुलताबाद येथे आगमन झाले. त्यांच्यासोबत प्रसिद्ध विधीज्ञ एडवोकेट महबूब निजामी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सुफी संतांची भूमी असलेल्या खुलताबादमध्ये या मान्यवर पाहुण्यांचे विविध दर्गा समित्यांच्या वतीने अत्यंत आदराने आणि शानदार स्वागत करण्यात आले.

सय्यद फरीद अहमद निजामी यांनी सर्वप्रथम हजरत बुरहानुद्दीन गरीब (र.) यांच्या दर्ग्यात हजेरी लावली. यावेळी दर्गा समितीचे अध्यक्ष एजाज अहमद, सचिव मोहम्मद मतीन आणि सदस्य सालेह मोहम्मद यांनी त्यांचे स्वागत केले. मान्यवरांनी दर्गा परिसरात दर्शन घेऊन प्रार्थना केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दर्ग्याच्या ऐतिहासिक महत्त्वावर चर्चा केली आणि पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला.

त्यानंतर त्यांनी हजरत सय्यद जैनुद्दीन मौलाना दाऊद हुसेन शिराजी (बावीस ख्वाजा) यांच्या दर्ग्याला भेट दिली. या प्रसंगी अध्यक्ष शरफुद्दीन मोहम्मद रमजानी, सचिव मसीयोद्दीन आणि हाजी इक्बाल अहमद यांनी सय्यद फरीद अहमद यांची पारंपरिक पद्धतीने 'दस्तारबंदी' करून स्वागत केले. या वेळी हमीदुद्दीन मौलवी, अबू मोहम्मद आणि अयाजोद्दीन यांनी पाहुण्यांशी तसव्वुफ (सुफीवाद) आणि थोर संतांच्या जीवनकार्यावर सविस्तर चर्चा केली.

या दौऱ्यात माजी नगराध्यक्ष तथा दर्गा कमिटी सदस्य एडवोकेट कैसरोद्दीन यांनी दर्ग्यांशी संबंधित कायदेशीर प्रश्नांवर मान्यवरांशी संवाद साधला. तसेच, पाहुण्यांनी हजरत ख्वाजा अमीर-ए-आला संजरी यांच्या दर्ग्यातही हजेरी लावली. या प्रसंगी आबिद जहांगीरदार, अलीमुद्दीन मुजावर, सादिक मुजावर आणि इरफानोद्दीन उपस्थित होते. एडवोकेट महबूब निजामी यांनी या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, "खुलताबादच्या या पवित्र भूमीवर येऊन आत्मिक शांती मिळाली," तसेच त्यांनी दर्गा समित्यांचे आभार मानले.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.