Breaking Ticker

नागपूर येथे 59 जातींचा संयुक्त विदर्भीय महामोर्चा संपन्न...



सम्यक रविंद्र घुले यवतमाळ

नागपूर, दि. 20 जून – अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात महाराष्ट्रातील 59 जातींच्या वतीने नागपूर येथे संयुक्त विदर्भीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात विदर्भासह राज्याच्या विविध भागांतून हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.

दीक्षाभूमी येथून सुरू झालेला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. मोर्चामध्ये महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. “जय भीम, जय संविधान”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

मोर्चादरम्यान उपस्थित वक्त्यांनी अनुसूचित जातींमधील आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करण्याची मागणी केली. संविधानाने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सर्व समाजघटकांनी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक प्रगतीसाठी आरक्षण व्यवस्थेचे मूळ स्वरूप कायम ठेवण्याची भूमिका मांडण्यात आली.

मोर्चा शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. आंदोलनकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. या महामोर्चामुळे राज्यातील अनुसूचित जाती समाजाच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले जाईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.