चहा विक्रेत्यावरील हल्ला प्रकरण बाजारसावंगीतील मुख्य मार्केट मधून आरोपींची धिंड
मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर
खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथील हॉटेल चालकेने चहा देण्यास उशीर झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून चहा विक्रेता आणि त्यांच्या भावावर जिवघेणा हल्ला करणाऱ्या ६ पैकी ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी शनिवारी दुपारी ३ वाजता या आरोपींची बाजार सावंगी गावातून भरचौकात धिंड काढली.
बाजार सावंगी येथील प्रद्युम्न पुंड आणि त्यांचा भाऊ ऋषिकेश पुंड यांच्यावर १८ जून रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोघेही भाऊ गंभीर जखमी झालेट असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या
प्रकरणी खुलताबाद पोलिसांनी कारवाई करत सहापैकी चार आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये अश्विन नलावडे, अनिकेत नलावडे, मनोज जाधव, आबाराव नलावडे, शुभम सराटे आणि बबलू शेख (सर्व रा. शेखपूरवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चारपैकी तीन आरोपींना शनिवारी घटनास्थळी आणले. तेथे त्यांची धिंड काढत पोलिसांनी केले. पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राजेश पाटील, नवनाथ कोल्हे व दिलीप बनसोड पुढील तपास करीत आहेत.
