Breaking Ticker

आरोग्य मंदिर कनकशीळ येथे असंसर्गजन्य रोग निदान, हिमोग्लोबिन व नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न



मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर 

आरोग्य क्षेत्रामध्ये माणुसकी जपणारे डॉ रमेश शेळके समुदाय आरोग्य अधिकारी यांनी माझे गाव आरोग्य संपन्न गाव उपक्रमांतर्गत ८५ नागरिकांची केली तपासणी कनकशीळ गाव आरोग्यसंपन्न गाव उपक्रमांतर्गत आरोग्य मंदिर कनकशीळ येथे असंसर्गजन्य रोग निदान शिबिर, हिमोग्लोबिन तपासणी व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण ८३ महिला व नागरिकांची आरोग्य तपासणी डॉ रमेश शेळके यांनी केली.

शिबिरामध्ये रक्तदाब, मधुमेह, विविध असंसर्गजन्य आजारांचे निदान, नेत्ररोग तसेच हिमोग्लोबिन तपासणी करून नागरिकांना आवश्यक आरोग्य मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणीद्वारे आजारांचे लवकर निदान होऊन योग्य उपचार घेण्याबाबत जनजागृती करण्यात आली. गरजू रुग्णांना पुढील सुविधांसाठी संदर्भित करण्यात आले.

हे शिबिर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. समाधान राऊत तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. निलोफर अंजुम, डॉ शुभम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडले. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रमेश शेळके, आरोग्य सहाय्यक विजय जाधव, सुनील जाधव, आरोग्य सेवक हर्षद शहा, आरोग्य सेविका वैशाली खडसे, बीएफ भाग्बाई जाधव, आशा हिरा दांडगे तसेच मदतनीस रंजना राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.

यावेळी उपस्थित नागरिकांनी अशा आरोग्यविषयक उपक्रमांचे स्वागत करून भविष्यातही अशा शिबिरांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.