Breaking Ticker

गोठ्याला आग लागून साहित्य जळून खाक, लाखोचे नुकसान, भरपाईची मागणी....



शेती करण्यासाठी आणलेले दोन बैल भाजले शेती ऊपयोगी साहित्य जळुण खाक....


मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतीनीधी 

बाजार सावंगी  खुलताबाद तालुक्यातील मौजे शेखपूर शिवारात दि.१३ शनिवारी दुपारी शॉर्टसर्कीट घर्षणाने चिंगारी पडून गोठा व गोठ्यातील शेती औजारे व इतर साहित्य जाळून खाक झाले तर दोन (गोडे बैल भाजल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील शेखपुर शिवारातील वाहीद दोशामद शेख पटेल यांनी दि. १३ शनिवारी दुपार पर्यंत शेतात औत हककले व दुपारी जेवणा साठी गेले. तेव्हा विद्युत तारीच्या घर्षणाने चिंगारी पडून गोठ्याला आग लागली असल्याचे वाहीद पटेल यांचे म्हणणे आहे.

गोठ्यात दोन बैल सुरु असलेल्या खरिप पिक हंगाम शेती मेहनत मशागत साठी आणले होते. ते आगीत भाजले. तर गोठ्यात असलेले शेती उपयोगी साहित्य औजारे कपडेलत्ते धान्य खते बी बियाणे साहित्य ठिंबक कुट्टी यंत्र व १०-१५चारा भोज सह लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे वाहीद पटेल यांचे म्हणणे आहे. त्यात दोन बैल गंभीर भाजले आहे.

अचानक घडलेल्या जळीत घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी पाहणी करून पंचनामा केला आहे. महसूल विभागाने पाहणी व पंचनामा करुन वरिष्ठांकडे आहवाल पाठवून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी व नागरिकांतून करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.