Breaking Ticker

मराठा समाजाला आरक्षण मिळणारच. मनोज पाटील जरांगे


गेवराई प्रतिनिधी बाळराजे जाधव

 आज मा. मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी १४ मागण्यावर पुन्हा सविस्तरपणे चर्चा झाली आहे... उद्या होणार्‍या कॅबिनेट बैठकीत सर्व मागण्यांवर चर्चा होणार आणि येत्या आठच दिवसात सर्व मागण्यांचा GR काढून, सर्व मागण्या लागू करणार असे मा.मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले आज सांगितले आहे... यावेळी साह्याद्री शासकीय अतिथीगृहावर मा.ना.संदिपानजी भुमरे साहेब, कॅबिनेट मंत्री, मा.ना. दादाजी भुसे साहेब, कॅबिनेट मंत्री, मा. सुमंतजी भांगे साहेब, सचिव-सामान्य प्रशासन मंत्रालय, मा. खारगे साहेब-सचिव, मा. सुर्यवंशी साहेब, सचिव मंत्रालय, मा.आ.नारायण कुचे साहेब, वरिल सर्व शासनाचे मंत्री महोदय व प्रशासनाचे सचिव आज झालेल्या बैठकीला उपस्थित होते. 

आम्ही सरकारला काहीही करा पण आठ दिवसांत सर्व मागण्या लागू करा, जर आठ दिवसांत १४ मागण्यांची अंमलबजावणी नाही झाली तर मी पुन्हा आंदोलन करणारच, असे आम्ही बैठकीत सांगितले आहे, परंतु मा. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की, आम्ही उद्यापासूनच एक एक मागणीचा निर्णय घ्यायला सुरुवात करत आहोत, येत्या आठ दिवसांत सर्व मागण्या लागू करण्यात येतील, असे आम्हाला आज साहेबांनी शब्द दिला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.