Breaking Ticker

खुलताबाद ऑनलाईन खत विक्री बंद करा


     

ऑफलाईन पद्धत सुरू करा  ग्रामपंचायत सदस्य अरुण गायकवाड यांची तहसिलदारांकडे मागणी......

मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर दि 12/6/25

खरीप हंगाम तोंडावर आला असताना शासनाच्या ऑनलाईन खत विक्री अॅपमुळे शेतकरी हैराण झाले आहेत. या अडचणी दूर करण्यासाठी बाजारसावंगीचे ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. अरुण साहेबराव गायकवाड यांनी आज खुलताबादचे मा. तहसिलदार साहेब यांना निवेदन दिले.


निवेदनातील ठळक मुद्दे

1. *मोबाईल-OTP अडचण*: अनेक शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, त्यामुळे OTP मिळत नाही

2. *तांत्रिक बिघाड*: साईट बंद राहते आणि अॅपमध्ये तांत्रिक त्रुटी आहेत  

3. *इंटरनेट समस्या*: ग्रामीण भागात नेटवर्क/डेटा प्रॉब्लेममुळे व्यवहार होत नाहीत

4. *वेळेवर पुरवठा नाही*: हंगामाच्या तोंडावर खत मिळण्यास विलंब होतोयछ


*गंभीर इशारा*: मृग नक्षत्र सुरू होऊन 4-5 दिवस झाले. पाऊस कधीही पडू शकतो. वेळेत खत न मिळाल्यास शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल आणि देशालाही फटका बसेल. ही बाब लक्षात घेऊन तालुक्यात तात्काळ ऑनलाईन पद्धत बंद करून ऑफलाईन खत विक्री सुरू करावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.


 जिल्हाधिकारी छ. संभाजीनगर, तालुका कृषी अधिकारी खुलताबाद, पंचायत समिती गटविकास अधिकारी यांनाही पाठवण्यात आली.निवेदनावर अरुण गायकवाड यांच्यासह कलीम पठाण आणि विरेंद्र वाघ यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.