त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी: शंकर निंबारे
दि. १४/०५/२०२३
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खडकओहोळ ग्रामपंचायतीतील जांभूळपाडा ग्रामस्थांना पाणीटंचाई समस्येसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून टँकर पाठवण्यात येईल. असे फक्त आश्वासने नशिबी, अजूनही गावात टँकर पोहोचलेच नाही.
जांभूळपाडा गावात अंदाजे २०० लोकसंख्येची वस्ती असून गावाला दोन विहिरी खोदून बांधण्यात आल्या आहेत. दोन्ही विहिरी कोरड्या अवस्थेत आहेत. ग्रामस्थांनी पर्यायी व्यवस्था म्हणून ग्रामपंचायतीकडे टँकरचे मागणी केली असता फक्त आश्वासने मिळाली. अजूनही गावात टँकर पोहोचले नाही. जांभूळपाडा गावाची पाणीटंचाई पूर्णता: घालवण्यासाठी प्रशासनाने प्रामुख्याने लक्ष द्यावे. अशी मागणी कैलास खुताडे, ढवळू बान्गे पारीबाई बान्गे, पिंटी वड, रमेश धनगरे, सुरेखा बान्गे, पिंटू किरकिरे, वसंत धनगरे, आदींनी केली.
