Breaking Ticker

पंकजाताई मुंडेंचा एक फोन अन् नेकनूरच्या भाविकांचा पुढील प्रवास झाला सुकर


गेवराई प्रतिनीधी बाळराजे जाधव


भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाचा करिश्मा बीड जिल्हयातील भाविकांना काल अनुभवास आला, त्यांच्या एका फोनमुळे नेकनूर येथील भाविकांचा हरिद्वारचा प्रवास सुकर होऊ शकला.

   त्याचं असं झालं, नेकनूर येथील ह.भ.प. लक्ष्मण महाराज मेंगडे हे एक हजार भाविकांसमवेत हरिद्वार ला जाण्यासाठी प्रवास करत होते, त्यांच्यासोबत अन्न धान्याची ट्रक, स्वयंपाकी व कांही सेवेकरी देखील होते. महाराष्ट्रातून मध्यप्रदेशच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर सैंधवा बॉर्डर वर त्यांची धान्याची ट्रक व सोबतच्या माणसांना पोलिसांनी अडवले व काही तरी कारण देऊन दुपारपासून ताटकळत ठेवले. ट्रकची पासिंग व सर्व आवश्यक कागदपत्रं त्यांनी पोलीसांना दाखवली पण ते त्यांना सोडण्यास काही तयार नव्हते. शेवटी मेंगडे महाराजांनी सायंकाळी पंकजाताई मुंडे यांच्याशी संपर्क करून सर्व हकीकत सांगितली. पंकजाताईंनी लगेचच मध्यप्रदेशातील स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलून पोलिसांना संपर्क साधला आणि मग विनाकारण अडवलेली गाडी पोलिसांनी अखेर सोडली, त्यानंतर भाविक पुढील प्रवासाच्या दिशेने रवाना झाले. या सर्व प्रकारात भाविकांसाठी वेळीच धावून आलेल्या पंकजाताईंचे आभार व्यक्त करण्यास मात्र मेंगडे महाराज विसरले नाहीत. 

••••

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.