Breaking Ticker

फेडरेशन ऑफ रेकनाईझ ऑर्गनायझेशन्सची पुणे विभागीय चिंतन बैठक उत्साहात पार


दैनिक समीकरणप्रतिनिधी : गणेश दिवेकर

पुणे : फेडरेशन ऑफ रेकनाईझ ऑर्गनायझेशन्सच्या वतीने आयोजित करण्यात आलेली पुणे विभागीय सामाजिक कार्यकर्त्यांची चिंतन बैठक उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात पार पडली. यावेळी पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यामधून असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व संघटनांचे प्रतिनिधी यांच्या मोठ्या सहभागामुळे बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. 

या बैठकीत संघटना, संस्था व फेडरेशनच्या आगामी वाटचालीसंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. सामाजिक प्रश्नांवर एकत्रितपणे काम करण्याची गरज, संघटनात्मक बळकटी, तसेच विविध स्तरांवर समन्वय वाढवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामुळे आगामी काळात फेडरेशनच्या कार्याला अधिक गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश लोखंडे सर यांनी केले. पुणे विभागातील अनेक पदाधिकारी यांच्या नियुक्त्या यावेळी करण्यात आल्या यामध्ये पुणे विभागीय अध्यक्ष रमेश बोऱ्हाडे, विभागीय उपाध्यक्ष पूजा गांधी, संतोष बागमार, अतुल पाटील, विभागीय सचिव गणेश दिवेकर, सह सचिव ऑड. नरेंद्र पोळ, तसेच कार्यकारी सदस्य डॉ. रूपेश शिंदे, शेखर लांडगे आणि ईश्वरदादा झांबरे पाटील 

पुणे जिल्ह्यातून एस. डी. भोसले (पुरंदर) – जिल्हा अध्यक्ष, सुनील गुजर (मावळ) – जिल्हा उपाध्यक्ष, दत्तात्रेय झेंडे (हवेली) – जिल्हा सचिव, सुरेश राजपुरे (बारामती) – जिल्हा कार्यकारी सदस्य, बबीता हरपळे (हवेली), इस्माईल शेख (हवेली) – जिल्हा कार्यकारी सदस्य, तसेच गणेश आवटे (जुन्नर), नंदकिशोर कामथे (पुरंदर), भानुदास वाळुंज (शिरूर), खंडू गव्हाणे (शिरूर), रणजित पाटील (मुळशी) 

सातारा जिल्ह्यातून अशोक पवार (कराड) – जिल्हा अध्यक्ष, ज्ञानेश्वर मारगजे (खंडाळा) – जिल्हा उपाध्यक्ष, उमेश मोहिते (कराड) – जिल्हा सचिव, रामचंद्र रायते (कराड) – जिल्हा कार्यकारी सदस्य, संदीप यादव – कराड तालुका अध्यक्ष, मानसिंगराव डुबल – कराड तालुका उपाध्यक्ष उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातून शशीशेखर पाटील (पंढरपूर) – जिल्हा अध्यक्ष, बाळू जाधव (माढा) – जिल्हा उपाध्यक्ष, इब्राहिम मुल्ला (उत्तर सोलापूर) – जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातून बाळासाहेब आदमापुरे (राधानगरी) – जिल्हा अध्यक्ष, शैलेश माळी (करवीर) – जिल्हा उपाध्यक्ष, विनोद व्हराटे (शिरोळ) – जिल्हा उपाध्यक्ष, नीलेश चौगुले (राधानगरी) – जिल्हा सचिव, वैभव पाटील (शाहूवाडी) – तालुका अध्यक्ष, शिवाजी आसनेकर (राधानगरी) – तालुका अध्यक्ष उपस्थित होते.

या बैठकीत विविध भागांतून आलेल्या कार्यकर्त्यांनी आपले अनुभव मांडत संघटनात्मक कार्य अधिक प्रभावी करण्यासाठी सूचना मांडल्या. सर्वांच्या सहकार्यामुळे बैठक यशस्वीपणे पार पडली असून, शेवटी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.