काल साऱ्या महाराष्ट्रातील संघटना च लक्ष लागलं होतं की "मानवहीत" राज्यव्यापी बैठकीत काय होणार ? अनेक संघटनाचे मला मेसेज आले.सध्या महाराष्ट्रात आदरणीय सचिनभाऊ साठे यांची चर्चा जास्त होत आहे.त्याला कारण ही तसेच आहे KCR BRS सोबत सचिन भाऊ साठे जातील. या विषयावर दीर्घ स्वरूपात चर्चा झाली.लवकरच राजकीय समीकरण बदलण्यात येणार आहेत असे सूतोवाच सचिन भाऊ साठे यांनी केले.
मानवहीत लोकशाही पक्षाच्या या बैठकीत प्रत्येक तालुकाध्यक्षाना १० शाखा स्थापन करण्याचे टार्गेट देण्यात आले. प्रत्येक जिल्हाध्यक्षाना १०० शाखा स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. लवकरच पक्षाच्या केंद्रीय टीम पदभारामध्ये बदल करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात च नव्हे तर तेलंगणा पर्यंत सचिन भाऊ साठे यांचे नाव व पक्ष गाजलेला आहे.त्या दृष्टीने वाटचाल करण्यासाठी कठोर निर्णय घेण्यात आले आहे.या बैठकीत "राज्यातील प्रस्तापित पक्ष दखल घेत नाहीत गाढवाच्या गळ्यात हार घालून त्याला गुलाम बनवून फक्त उठ बस म्हणणाऱ्या पुढाऱ्यांना जवळ करून सचिन साठे च खच्चिकरन करू पाहणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार" असे सचिन भाऊ खडसावून सांगितले.मा.लो.पा.कार्याध्यक्ष डॉ माणिक कांबळे साहेब यांनी पक्षाबद्दल अनेक सूचना केल्या.काही महिन्यात जी मरगळ आलेली आहे ते झटकून कामाला लागावे असे परखड मत व्यक्त केले.राज्याचे कोर कमिटी अध्यक्ष ॲड टी एन कांबळे साहेब यांनी मानवहीत जिवंत ठेवत राजकीय समीकरणे जोडू व माझे पूर्ण आयुष्य सचिन भाऊ साठे यांना साथ देत घालवून सचिन साठे सारख्या चारित्र्य संपन्न नवतरुण नेत्याला समाजाने साथ देत असेल तर आम्ही मागे पुढे न बघता बारा हत्तीच बळ देऊ अशी भूमिका मांडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर.बी.साठे साहेबांनी परखड बोलत पक्ष वाढीसाठी साम दाम दंड भेद वापरत मानवहीतचा झेंडा संपूर्ण. महाराष्ट्रात फडकवू कार्यकर्ते मोठे करू असे यावेळी म्हणाले.या बैठकीचे आयोजन औरंगाबाद जिल्हा टीम ने केले.
बैठकीला पक्षाचे सर्वच जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. व्यासपीठावर पक्ष प्रमुख आदरणीय सचिन भाऊ साठे, ॲड. टी.एन.कांबळे साहेब,(कोर कमिटी अध्यक्ष),गणेश भाऊ भगत साहेब(राष्ट्रीय सचिव),मा.अनिल भाऊ सरोदे(उपाध्यक्ष), मा. डॉ माणिक कांबळे साहेब (कार्याध्यक्ष), मा.आर.बी.साठे साहेब(प्रदेशाध्यक्ष), मा.बालाजी घुमाडे (युवक प्रदेशाध्यक्ष),मा. आशोक उफाडे साहेब(मार्गदर्शक),मा.शाहीर व्यंकटी सोनटक्के साहेब (स्टार प्रचारक), मा. मोटे आण्णा (औरंगाबाद निरीक्षक),मा.आकाश बागुल (प्रवक्ते), मा.राजू धुरंदरे(युवक उपाध्यक्ष), मा.शारदा ताई (बुलढाणा जिल्हाध्यक्ष), मा.हनुमंत क्षीरसागर(बीड जिल्हाध्यक्ष),मा.कृष्णा गायकवाड (जिल्हाध्यक्ष औरंगाबाद), दीपक खैरनार(जिल्हाध्यक्ष औरंगाबाद), आदी.
सोशल मिडीयाचे पदाधिकारी मी, आकाश घोलप ,देवा गवळी,किरण दाढेल, पवन यंगड उपस्थित होते.
सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा.विनोद भाऊ गायकवाड (परभणी), मा.मिलिंद वाघमारे(जिल्हा उपाध्यक्ष परभणी), मा.हनुमंत पाटोळे(उस्मानाबाद), मा.रामप्रसाद कसाब(जालना), मा.हनुमंत क्षीरसागर(बीड), मा.मिलिंद मुजमुले(बीड), मा.विलास झोंबाडे (पुणे जिल्हाध्यक्ष), मा.सागर साठे(पुणे युवक जिल्हाध्यक्ष),मा.सुशील कांबळे (लातूर),मा.मालोजी वाघमारे(नांदेड), मा.नागेश्वर पाटेकर (बुलढाणा), मा.किशोर भाऊ कवडिकर (नांदेड उत्तर), गणपती घोडापुरकर (तेलंगणा प्रदेशाध्यक्ष) ,पार्वती ताई बरकंबे (महिला जिल्हा नांदेड),छायाताई मोरे..
औरंगाबाद टीम चे पक्षातर्फे आभार अत्यंत चांगल्या पद्धतिचे नियोजन केले होते. यावेळी अनेकांचा पक्ष प्रवेश,पदाधिकारी निवडी करण्यात आल्या.
