Breaking Ticker

ऊस घालूनही कारखान्याकडून बील मिळत नसल्याने, शेतकऱ्याची आत्महत्या



गेवराई प्रतिनिधी बाळराजे जाधव

ऊस घालूनही बील मिळत नाही. शिवाय, कारखाना दुर्लक्ष करतोय. मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज कसं फेडायचं ? या विवंचनेत असणाऱ्या एका 40 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आपण विष का पिलो? हे विष प्राशन केल्यानंतर व्हिडिओ बनवत शेतकऱ्यांने आपली व्यथा मांडलीआहे.गेल्या  वर्षाची घटना ताजी असतानाच एक वर्ष पूर्ण   नामदेव जाधव  या  शेतकऱ्यांनी  ऊस जात नसल्या आत्महत्या  केली  होती त्याचप्रमाणे यंदाही एका शेतकऱ्याला उसासाठी आत्महत्या करावा लागेली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तात्यासाहेब हरिभाऊ पौळ (वय 40) असे आत्महत्या केलेल्या गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचे नाव आहे. तात्यासाहेब पौळ यांनी अहमदनगरच्या पियुष शुगर लिमिटेड वाळकी या कारखान्याला आपला ऊस घातला होता. या ऊसाचे बील मिळावे यासाठी गेल्या 3 महिन्यांपासून तात्यासाहेब पाठपुरावा करत होते. मात्र पाठपुरावा करूनही बील मिळत नसल्याने, आता मुलीच्या लग्नाला घेतले कर्ज कसं फेडायचं? या विवंचनेत तात्यासाहेब यांनी 2 दिवसांपूर्वी विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांनी आपण आत्महत्या का करतोय ? याचा व्हिडीओ बनवला. मात्र, उपचारादरम्यान बीडच्या जिल्हा रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला आहे.

तात्यासाहेब पौळ यांनी मुलीच्या लग्नासाठी बँकेकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज कसं फेडावं असा प्रश्न त्याच्यापुढे होता. त्यामुळे अनेक वेळा चकरा मारूनही बील न दिल्याने या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या कारखान्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि कुटुंबीयांना कारखान्याने 50 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, सरकार अन् मंत्र्यांना आतातरी जाग येणार का आणि सत्ता टिकवण्यासाठी आणि स्थापन करण्यासाठी, आपला जीवपणाला लावणाऱ्या मंत्र्यांना बीड जिल्ह्यातील हे वास्तव दिसणार का? असा सवाल संतप्त शेतकाऱ्यांमधून होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.