Breaking Ticker

लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राहुल बोंद्रे यांचा सत्कार



लोणार सुनिल वर्मा

 दिनांक :-15 मे रोजी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.बुलढाणा जिल्ह्यामध्ये 10 कृषी उत्पन्न बाजार समिती जागे साठी निवडणूक हो घातली होती बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, राष्ट्रवादीचे नेते, तथा माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, यांच्या मार्गदर्शनात व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर, जिल्हा अध्यक्ष उद्धव बाळासाहेब गटाचे जालिंदर बुधवत, तिन्ही पक्षाचे नेते यांनी महाविकास आघाडीच्या वतीने 10 जागे साठी कृषीउत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे संचालक संपूर्ण तालुक्यात निवडणूक लढवली

 त्यामध्ये महाविकास आघाडीच्या दहा जागे पैकी सात जागेवर दणदणीत विजय मिळवला तसेच चिखली मतदार संघाचे माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात *चिखलीच्या मतदारांनी 18 संचालकापैकी 17 संचालक* राहुल बोंद्रे यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षाला भरभरून आशीर्वाद रूपाने मतदान करून निवडून दिले त्याबद्दल लोणार शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 14 मे रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे चिखली येथील कार्यालयात दुपारी ३ वाजता राहुल बोंद्रे यांचा लोणार शहर काँग्रेस कमिटीचे वतीने शहराध्यक्ष तथा मा. उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद, ज्येष्ठ काँग्रेसचे नेते माजी जिल्हा सरचिटणीस साहेबरावजी पाटोळे, ज्येष्ठ नेते दौलत मानकर, यांनी राहुल बोंद्रे यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, देऊन मान सन्मान केला. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले की येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी साठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यांनी जोशाने कामाला लागा व येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये सर्व सदस्य निवडून आणून बुलढाणा जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा व कार्यकर्त्यांनी आज पासून कामाला लागा असे सांगितले यावेळी त्यांनी सांगितले

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.