Breaking Ticker

घडलेल्या प्रकारादरम्यान जीवित हानी टळली मात्र तीन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान


लोणार तालुका प्रतिनिधी सुनिल वर्मा 

    आज दिनांक 25 जून रोजी अंदाजे दुपारी तीन वाजे दरम्यान जामा मस्जिद चौकातून उत्तरेकडील बाजूला असलेल्या लोणार ते पिंपळखुटा कोयाळी व इतर ग्रामीण भागात जात असलेला अरुंद रस्त्यावर सचिन ताराचंद खिवसरा यांच्या गोडाऊन समोर उभा टाटा ट्रक एम एच 28 डी इ 2741 लोडिंग ट्रक मध्ये सोयाबीन माल भरीत असतांना एअर ब्रेक ट्रक चा एअर सुटल्याने ब्रेक फेल होऊन समोरील रस्त्यावर असलेला महावितरण विभागाचा सुरू लाईनचा मोठा विद्युत खांब तोडून पुढे असलेली एक मोटरसायकल व दोन कार यांना धडक देऊन ट्रक थांबला परंतु या दरम्यान एक मोटर सायकल व दोन कार या रस्त्याच्या साईडला असलेल्या नाल्यामध्ये जाऊन त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

     मात्र या दरम्यान कुठल्याही प्रकारचा जीवित हानी झाली नाही याबाबत सविस्तर वृत्त असे की लोणार शहरातील जामा मस्जिद चौकाला लागूनच उत्तरेकडील ग्रामीण भागातील जाणाऱ्या मुख्य अरुंद रस्त्यावर सचिन ताराचंद हिवसरा यांचे होलसेल भुसार मालाचे गोडाऊन व गादी कारखाना समोर या अरुंद रस्त्यावर नेहमीच मोठ मोठ्या लोडिंग गाड्या येत असतात तसेच सदर गोडाऊन जवळच पिंपळखुटा कोयाळी उदनापूर व त्या रस्त्यावरील इतर गावांकडे जाणारे ऑटो रिक्षा उभे राहत असतात या ग्रामीण भागातील ऑटो रिक्षा चालकांना तसेच ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला या लोडिंग वाहनांचा नाहकच त्रास सहन करावा लागत असून यामुळे लोणार शहरात जाणारा मुख्य बस स्टॅन्ड चौक ते धार हा रस्ता सुद्धा ट्राफिक नेहमीच ट्राफिक जाम होत असतो सदर बाब ही लोणार शहरातील पोलीस प्रशासन तसेच नगरपालिका प्रशासन यांना माहीत असताना सुद्धा याकडे शासनाचे प्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. 

    अशा प्रकारच्या दुर्लक्षित कारभारामुळे मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्यावरच पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन आशा बाबीवर लक्ष येणार का आज रोजी लोणार शहरात गल्लोगल्ली अनेक व्यापारी जागा भाड्याने घेऊन मोठमोठे वाहने बिनधास्तपणे आणून दुकानाचा माल खाली करतात त्याचप्रमाणे धार ते दैत्यसुदन मंदिरा कडे जाणारा प्रताप चौक, गेलडा भवन, जैन मंदिर, डोंगरवाल चौक, मेन रोड सराफा बाजार रस्त्यावरून पर्यटकांना जावे यावे लागत असल्याने मात्र या रस्त्यावर सुद्धा सराफा दुकानदार यांचे तसेच ग्राहकांचे वाहने बेशिस्तपणे उभे राहत असतात त्याचप्रमाणे अल्पवयीन मुले लोणार शहरात गल्लोगल्ली सुद्धा टू व्हीलर गाडी मोठमोठ्या आवाजाचे सायरन तसेच बुलेटचे फटाके फोडत जोरात गाडी चालवत आहेत हे असे एक नाही तर नियमबाह्य अनेक प्रकार घडत असताना व ते स्पष्ट दिसत असताना सुद्धा स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने शासनाचे नियम धाब्यावर ठेवून अरुंद रस्ता दिसताना सुद्धा मोठे वाहन रस्त्यावर आणणे, बेशिस्तपणे जोरात वाहन चालविणे या प्रकारामुळे एखाद्याची जीवित हानी झाल्यास यास कोण जबाबदार राहणार याबाबत नागरिकांमध्ये चर्चा दिसून येत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.