Breaking Ticker

आसंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन



 बुलढाण्याचे धरमवीर आसंजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा विधानसभा मतदार संघामध्ये २९ व ३० मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या मंगळवार ३० मे रोजी शिव-शंभू चरित्रकार बुलढाणा येथे रामायण भागवताचार्य हमप. गजाननदादा पवार शास्त्री, जालना यांच्या हरिकिर्तनाचे सायंकाळी ७ ते ९ दरम्यान शेलार मामा चौक, जुनागाव बुलढाणा आयोजन करण्यात आले आहे.

अभिष्टचिंतन सोहळ्याचे रात्री ९ ते १० वाजता आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अलंकापुरी श्रीक्षेत्र आळंदी देवीची येथील मानाचा वारकरी फेटा बांधून अभिष्टचिंतन सोहळा आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमांचे आयोजन शिवभक्त राजेश धोंडुजी मंगळे २ जिल्हाध्यक्ष, शिववाहतूक सेना व बुलढाणा व हमप. राजेंद्र महाराज तळेकर विदर्भ अध्यक्ष, म. रा. वारकरी महामंडळ, जिल्हाध्यक्ष शिव वारकरी सेना, बुलढाणा जिल्हा यांच्यावतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.