लोणार तालुका प्रतिनिधी सुनिल वर्मा
लोणार:-दिनांक ७ रोजी तालुका अचानक वादळी वाऱ्यासह पाणी पडल्याने कोयाळी दहातोंडे येथील शेतकरी यांच्या शेतातील सौर ऊर्जा पॅनलचे अतोनात नुकसान. झाले लोणार तालुक्यातील कोयाळी येथे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतात लावलेले सौर ऊर्जा पॅनलचे मोठे नुकसान झाल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की कोयाळी दहातोंडे येथे 7मे रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. कोयाळी येथील शेतकरी मनोहर रामभाऊ दहातोंडे यांच्या कोयाळी येथील शेत गट नंबर 102 या शेतामधील लावलेला सौर ऊर्जेच्या पॅनलचे मोठे नुकसान झालेले आहे. तसेच त्यातील सहा सौर ऊर्जा प्लेट्स फुटल्या यात शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून याची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी मनोहर रामभाऊ दहातोंडे करीत आहेत.
