देवडोंगरे प्रतिनिधी: शंकर निंबारे
दिनांक ३१/५/२०२३
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरी येथील सौ. सविता निंबारे व सौ. आनंदी पागी सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी देवडोंगरी परिसरातील गाव, पाडा, वाडी, वस्ती वर जाऊन महिलांसोबत समन्वय साधून आरोग्य विषयी, महिलाचे बचत गट, किशोरवयीन मुलींच्या समस्या व मार्गदर्शन तसेच बालविवाह या विषयावर सामाजिक कार्य केले असल्याने या महिलांची ग्रामपंचायतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी निवड केली.
आज दिनांक ३१/५/२०२३ रोजी ग्रामपंचायत कार्यालय, देवडोंगरी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्ताने उपसरपंच भाऊराव गवळी यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी सन्मान पुरस्कार, सन्मान चिन्ह व श्रीफळ, शाल देवून सौ. सविता निंबारे व आनंदी पागी ह्य महिलांना सन्मानित केले. यावेळी उपस्थित संदीप चारुडे ग्रामसेवक, भाऊराव गवळी उपसरपंच, कमलबाई टबाले ग्रा.प.सदस्य, नामदेव टबाले, महेश शेवरे ग्रामपंचायत शिपाई, तुकाराम पागी पाणीपुरवठा कर्मचारी, भागीरथ घुटे कॅम्पुटर ऑपरेटर, मंजुळा पवार पेसा मोबिलायझर, अशोक गावित आरोग्य कर्मचारी, दया निंबारे आशा वर्कर, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
