Breaking Ticker

35 वर्षीय महिलेवर 8 नराधमांचा बलात्कार

  

बुलढाणा शहरालगतच्या राजूर घाटात एका 35 वर्षीय महिलेवर आठ नराधमांनी चाकूचा धाक दाखवून आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. बलात्काराची माहिती मिळाल्यानंतरही बोरखेडी पोलीस घटनास्थळी पोहचले नाहीत, 2 ते 3 तास उलटल्या नंतरही गुन्हा दाखल करण्यात आलं नाही म्हणून आमदार संजय गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत बोरखेडी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला व अखेर पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केलाय, हे आठही आरोपी सध्या फरार आहे. राजूरच्या घाटात अशाच सहा घटना घडल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.


पीडित महिला ही तिच्या नातेवाईक व्यक्तीच्या एका मित्रासोबतच गुरुवारी राजूर घाटातून दुपारी जात होती दरम्यान राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी ते थांबले असता त्या ठिकाणी आठ जणांचा हा घोळका आला होता. त्यांनी तक्रारकर्त्या व्यक्तीसोबत असलेल्या महिलेच्या गळ्याला चाकू लावून फिर्यादीच्या खिशातील 45 हजार रुपये लुटले. सोबतच महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. दरम्यान ही घृणास्पद घटना समजताच आमदार संजय गायकवाड यांनी रात्री आठ वाजेच्या सुमारास बोराखेडी पोलिस ठाणे गाठले. सोबतच पोलिस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. व घडलेल्या या गंभीर प्रकाराबाबत आ. संजय गायकवाड यांनी पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांनाही कल्पना दिली. त्यानंतर बोराखेडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी हालचाल सुरू केली. त्यानंतर रात्री उशिरा याप्रकरणात पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.