Breaking Ticker

वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले डुंगी व इतर विमानतळ ग्रस्त गावाची पाहणी.



पनवेल तालुका प्रतिनिधी:- धनाजी पुदाले 

पनवेल तालुक्यातील डुंगी गावात दरवर्षी मुसळधार पावसामुळे पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात पुराच्या पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी डुंगी व विमानतळ नगर गावांना भेट देऊन पाहणी केली डुंगी गावात दरवर्षी मुसळधार पावसामुळे पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, यासंदर्भात पुराच्या पाण्याची समस्या जाणून घेण्यासाठी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीत वरिष्ठ पोलीस  निरीक्षक नितीन ठाकरे यांनी ग्रामस्थां सोबत चर्चा करून पुराच्या पाण्याची समस्या व विमानतळ नगर गावाच्या समस्या याबाबत पोलिसांकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते; त्यानुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी डुंगी विमानतळ लगत गावांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी सिडको तर्फे पाणी निचरा होण्यासाठी लावण्यात आलेले सक्षम पंप तसेच कामाची पाहणी केली. त्याचप्रमाणे नवी मुंबई विमानतळ परिसराची पाहणी केली, यावेळी त्यांनी मुसळधार पावसात पाण्याचा साठा होऊ नये म्हणून घेण्याची काळजी व सुचना दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे गोपनीय विभागाचे अधिकारी संजय घाडेराव , किरण सोनावणे व ग्रामस्थ उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.