Breaking Ticker

लोणार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; ३ शेतकरी वाहून गेले; झाडाच्या मुळांना धरून दोघे वाचले पण एक सापडेना! एका बैलाचाही मृत्यू



सुनिल वर्मा लोणार तालुका प्रतिनिधी 

लोणार तालुक्यातील काही गावांत ४ जुलैच्या दुपारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसात तिघे वाहून गेले, त्यापैकी दोघे वाचले असून एक बेपत्ता आहे. बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू आहे. शिवाय एका बैलाचा देखील वाहून मृत्यू झाला आहे. लोणार तालुक्यातील शिवणी जाट गावात ही घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव समाधान श्रीराम सरकटे (४२) असे आहे. त्यांच्या दोन सहकाऱ्यांसमवेत नाल्यात माशा पडकतांना आलेल्या पुरामुळे तिघे वाहून गेले. सुदैवाने झाडाच्या मुळांना पकडल्याने त्यांचे दोन सहकारी वाचले. मात्र समाधान सरकटे नाल्याच्या पुरात वाहून गेले. गावकऱ्यांनी शोध घेऊनही ते सापडले नाहीत. नाल्याने वाहून ते धरणापर्यंत गेले असावेत असा अंदाज आहे. दरम्यान रात्री अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणार तहसीलदार गिरीश जोशी, शिवसेना नेते नंदू मापारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.