Breaking Ticker

मध्यप्रदेश परिवहन महामंडळाची बस व दुचाकीची धडक; एक जण जागीच ठार तर दोघे गंभीर

 


प्रतिनिधी  

दिनांक २२ ऑगस्ट २०२३ मंगळवार रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता दागा पेट्रोल पंपाच्या अलीकडे दुचाकी व बसचा अपघात झाला म.प्र. राज्य परिवहन महामंडळाच्या एम पी ६८- पि ०२४६ या नांदुरा कडून खामगाव कडे जात असणाऱ्या बस चा एम. एच. २८- बिटी ७११६ या खामगाव कडून नांदुरा जात असणाऱ्या स्कुटीला समोरासमोर धडक होऊन अपघात झाला अपघाताची सदर माहिती मलकापूर मतदारसंघाचे आ. राजेश ऐकडे माहिती मिळतात ओम साई फाउंडेशन ला फोन करून रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवली. 


ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर आनंद वावगे राजू बगाडे वैभव सनिसे अभिषेक जैन पोलिस  कॉन्स्टेबल सुनील सुशिर हे रुग्णवाहिके सह घटनास्थळी हजर होऊन अपघात ग्रस्तांना प्रथम उपचार करण्या करिता नांदुरा पिएचसी येथे हलविण्यात आले परंतु दुर्दैवाने या घटनेमध्ये नागेश डोंगरे रा. पिंपरी गवळी या युवकाचा मृत्यू झाला त्याच्या सोबत असणारे राजेंद्र उर्फ प्रवीण  इंगळे रा. पिंपरी गवळी व विशाल बर्डे  रा. पिंप्री गवळी यांना ओम साई फाउंडेशन  च्या रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी खामगांव येथे हलविण्यात आले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.