Breaking Ticker

अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्याकडून आयुक्ताच्या आदेशाची होळी

 


लोणार  प्रतिनिधी सुनिल वर्मा 

 महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संपावर कुठल्याही प्रकारचा तोडगा न काढता त्यांचा संप मोडून काढण्यासाठी आयुक्तांकडून काढण्यात आलेल्या शासनाच्या जीआरची लोणार तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्याकडून होळी करण्यात आली

महाराष्ट्रातील दोन लाख 25 हजार अंगणवाडी सेविका मदतनीस चार डिसेंबर पासून आपल्या विविध मागण्यासाठी काम बंद करून संपावर गेलेल्या आहेत, शासन देत असलेले तुटपुंचे मानधन वाढवून अंगणवाडी सेविकांना 26हजार व मदतनीस यांना वीस हजार रुपये वेतनश्रेणी लागू करण्यात येवुन शासकीय दर्जा देण्यात यावा लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराचा दर 8 रुपया वरून प्रति लाभार्थी सोळा रुपये व कुपोषित बालकासाठी चोवीस रुपये करण्यात यावा सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर अनेक अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे दोन वेळेच्या जेवणासाठी त्यांना मुलांकडे किंवा सुनेकडे हात पसरावे लागत आहेत त्यांची अत्यंत वाईट अवस्था आहे 

    यासाठी शासनाने पेन्शन लागू करण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल महिन्यामध्ये दिलेल्या निकालपञामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी देण्यात यावी असे असतानाही शासन देण्यास टाळाटाळ करत आहे, यासह विविध मागण्यासाठी महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर गेलेल्या आहेत या संपावर तोडगा काढण्याचे सोडून शासन वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे त्याचाच भाग म्हणून एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्याचे आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जीआर काढलेला आहे त्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या ताब्यातील अंगणवाड्या ताब्यात घेण्यात याव्या, अंगणवाडीतील लाभार्थींना, स्तनदा माता, गरोदर स्त्रिया यांना देण्यात येणाऱ्या आहार शाळेतील आहार शिजवणाऱ्या महिला कडून शिजवुन घेण्यात यावा लाभार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी यासह अनेक प्रकारचे आदेश एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाला देण्यात येऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप कुठल्याही प्रकारच्या मागण्या मान्य न करता मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे म्हणून लोणार तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या समोर उपस्थित राहून या जीआरची आदेशाची होळी करण्यात आली.

यावेळी लोणार तालुका संघटनेच्या अध्यक्ष नंदिनी चव्हाण, उपाध्यक्ष शोभा भोकरे, पुष्पा मोरे, शारदा घायाळ यांच्यासह तालुक्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.