Breaking Ticker

एलईडी वाहनांद्वारे रस्ता सुरक्षाविषयक जनजागृती

 

 नांदेड : रस्ता सुरक्षा अभियान २०२४ हे १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत परिवहन विभागामार्फत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक माहिती व प्रबोधन व्हावे, याकरिता एलईडी वाहनांद्वारे रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती ६ ते ११ फेब्रुवारीर्यंत करण्यात येत आहे.

एलईडी वाहनांची सोमवारी परिवहन कार्यालय, नांदेड येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड शैलेश कामत यांचे हस्ते फित कापून रवाना करण्यात आले.

सदर कार्यक्रमाच्यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, मोटार वाहन निरिक्षक विजयसिंह राठोड, भाग्यश्री देशमुख, रेणुका राठोड, सहा. मोटार निरिक्षक नितीन राख, केशव जावळे, सतीश भोसले, सचिन मगरे व लिपीक कर्मचारी राजेश गाजुलवाड, गजानन शिंदे, गजानन पवळे व इतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाच्या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी, नांदेड यांनी उपरोक्त नांदेड शहरासह जिल्हयातील सर्व १६ तालुक्यांमध्ये उपरोक्त वाहनाद्वारे प्रबोधन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.