शहादा- आर एस विद्यामंदिर अनरद येथे गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त पुर्व संध्येला साने गुरुजी मित्र मंडळातर्फे स्वच्छ्ता एक सेवा ह्या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.या कार्यक्रमात सर्व प्रथम संत गाडगे बाबां यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक कोमलसिंग गिरासे होतें तर प्रमुख पाहुणे म्हणून शहादा साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी सचिव गुलाबराव पवार आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात माणक चौधरी व कोमलसिंग गिरासे यांनी स्वच्छता ही एक सेवा ह्या विषयावर विद्यार्थ्यांना मागदर्शन केले.
स्वच्छता ही एक सेवा ह्या निबंध स्पर्धेत सत्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता पैकी प्रथम मनिषा सुनिल माळी द्वितीय ज्योती रमेश सोनवणे तृतीय माया प्रविण बिरारे उत्तेजनार्थ ईश्वरी ज्ञानेश्वर गिरासे, पायल शिवाजी बागले ,सबा निजामुद्दीन शेख यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस व सन्मानपत्र देण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाबराव पवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रतिभा निंबोळकर व आभार व्ही आर गिरासे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अर्चना कुवर, बी वाय निकुंबे, पी के गिरासे, ए आर राजपूत यांनी परिश्रम घेतले.
