प्रतिनिधी- अक्षय चव्हाण
महाबळेश्वर-मेढा मार्गावर टेकवली गावाजवळ गव्याच्या धडकेत गंभीर जखमी झालेले रेंगडी, ता. जावली येथील प्रभाकर कासुर्डे यांचे सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास प्रभाकर कासुर्डे हे महाबळेश्वरहून आपल्या गावी परतत असताना, टेकवली स्टॉपजवळ अचानक जंगलातून आलेल्या गव्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यात ते गंभीर जखमी झाले होते.
