शहादा – पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे दि. २५ फेब्रुवारी २०२६ वार बुधवारी रोजी मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखती) चे आयोजन करण्यात आले आहे. दमण येथील नामांकित मॅक्लॉइड्स फार्मासुटीकल कंपनीचे अधिकारी पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) घेण्यासाठी येणार असून त्यामध्ये प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अशुरन्स, फर्मेंटेशन इंजीनियरिंग, स्टोर, वाटर सिस्टम, एचवीएस सिस्टम ह्या विभागांसाठी विद्यार्थ्यांची पूल कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यात येणार आहे. मॅक्लॉइड्स फार्मासुटीकल कंपनी ही एक अग्रगण्य कंपनी असून भारत व जागतिक बाजारपेठांमध्ये लक्षणीय कामगिरी आहे. ज्या विद्यार्थ्यांची पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (मुलाखतीमध्ये) निवड होईल अशा विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे चांगले व उत्तम पॅकेज दिले जाणार असून त्यासाठी पात्रता डी.फार्मसी, बी.फार्मसी, एम.फार्मसी, बी.एस.सी., एम.एस.सी., बी.ई. अँड बी.टेक, डिप्लोमा पॉलिटेक्निक, बी.कॉम, एम.कॉम आणि आयटीआय साठी आहे. जे विद्यार्थी मागील शैक्षणिक वर्षांत उत्तीर्ण झाले आहेत आणि चालू शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात शिकत आहे ते विद्यार्थी ह्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये इंटरव्ह्यू देऊ शकतात. सदर इंटरव्ह्यूमध्ये सहभाग घेण्यासाठी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ दुपारी २ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन (नोंदणी) दिलेल्या दोन गुगल फार्म लिंक द्वारे रजिस्ट्रेशन (नोंदणी) ऑनलाइन पद्धतीने करणे अनिवार्य आहे त्यात पहिली महाविद्यालयीन रजिस्ट्रेशन (नोंदणी) साठी गुगल फार्म लिंक https://forms.gle/JScVfM7mqp8yxXUq6 असून दुसरी रजिस्ट्रेशन (नोंदणी) साठी कंपनीची गुगल फार्म लिंक https://macleods.in/COE/Ad.aspx?VAL=d25wMmZGWFBHYXhycEFpU2FmNy9ydz09 असून याद्वारे ऑनलाइन पद्धतीने रजिस्ट्रेशन (नोंदणी) करणे अनिवार्य आहे. परिसरातील व महाविद्यालयातील विद्यार्थीयांना चांगल्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून त्यांना नोकरीसाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागणार नाही तसेच रोजगाराची गरज असलेल्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, उद्देशाने सदर कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील व महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ह्या पूल कॅम्पस इंटरव्ह्यूचा (मुलाखत) लाभ घ्यावा असे आव्हान पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा मंडळाचे संचालक मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांनी केले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पूल कॅम्पस इंटरव्ह्यूचा (मुलाखत) विषयी माहिती किंवा अडचण आल्यास त्यांनी खली दिलेल्या मो.नं. 9923441004, 8669153967, 9423916682 यांच्याशी संपर्क साधावा. सदर मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यू दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ वार बुधवारी सकाळी ८.३० वाजता पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय शहादा येथे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे तसेच आधार कार्ड, पॅन कार्ड, अंतिम वर्षाचे गुणपत्रक किंवा पदवी प्रमाणपत्र तसेच 2 फोटो व बायोडाटा सोबत घेऊन यावे.
शहादा येथील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यूचे दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ वार बुधवारी रोजी आयोजन.
0
February 23, 2026
Tags
