Breaking Ticker

शेतातील रब्बी पिक पिकविण्यासाठी बारा तास वीज पुरवठा करण्यात यावा ••• शेतकऱ्यांची मागणी



सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे व शेतकऱ्यांनी कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन •••••

गोरेगाव - १२/०२

            शेतकरी शेतात उपलब्ध असलेल्या विद्युत पंपाच्या सहाय्याने रब्बी धान लागवड करीत आहे पण मागील काही दिवसांपासून विद्युत पुरवठा हा दिवसाला फक्त आठ तास करण्याचे आदेश शासनाने दिले आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली आहे दिवसातून आठ तास विधुत पुरवठा सुरळीत राहत नसुन फक्त सहा तासच विद्युत पुरवठा राहत आहे यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील धान पिकाकरिता पाण्याची फार मोठी टंचाई निर्माण झाली आहे अगोदरच शेतकरी हवालादिल झालेला असुन वेळेवर शासन धानाचे चुकारे सुध्दा देत नाही त्यातच आठ तास विधुत पुरवठा मुळे शेतकरी फार मोठ्या संकटात सापडला आहे शासनाने शेतीकरिता दररोज १२ तास विधुत पुरवठा करण्यात यावा याकारिता आज दिनांक १२ फरवरी ला मोहाडी,कमरगांव,बाम्हणी,चोपा,मोहगांव तिल्ली येतील सरपंच व शेतकऱ्यांनी विज वितरण कंपनी रामनगर गोंदिया चे कार्यकारी अभियंता आनंद जैन यांना निवेदन देण्यात आले आले यावेळी मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे,बाम्हणी ग्राम पंचायत चे सरपंच झुमकभाऊ बिसेन, मोहगाव चे सरपंच सुरजलाल पटले, कमरगांव चे उपसरपंच धनराज कटरे, शेतकरी मुकेश नागपुरे,सुरेश बिरणवार,राकेश बंन्सोड,सुरजलाल येळे, नरेंद्र कटरे, कैलास गौतम आदी शेतकरी उपस्थित होते


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.