Breaking Ticker

डॉ आंबेडकर यांची 135 व्या जयंती निमित्त सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी 135 पेनांचा हार डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्यास अर्पण



 कमलाकर वाघमारे प्रतिनिधी,जळकोट

आज दिनांक 25 एप्रिल २०२६ रोजी मौजे शेलदारा ता .जळकोट जी.लातूर येथे प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सेशेलदरा येथील सर्पमित्र सिद्धार्थ काळे यांनी 135 पेनचा हार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास हार अर्पण करून मानवंदना दिली व समाजापुढे अनोख्या पद्धतीने एक नवीन आदर्श निर्माण केला यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक, भीम अनुयायी व मान्यवर उपस्थित होते.

डॉ बाबासाहे आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्त सर्प मित्र सिद्धार्थ काळे व राजकुमार काळे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला 135 पेनाचा हार बनवून अनोख्या पद्धतीने समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण करून दिला.याच लेखणी ने समाजाला काळोखाच्या खाईतून बाहेर काढायचे काम केले.याची एक आठवण म्हणून पेनाचा हार अर्पण करण्यात आला.या जयंती मध्ये शेलदरा गावातील सर्व समाज बांधवांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सर्वधर्म समभाव व समतेचा आदर्श निर्माण केला.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.