प्रतिनिधी,जळकोट कमलाकर वाघमारे
दिनांक 26 मे 2026 रोजी जळकोट तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त जळकोट काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस पक्ष कार्यालय येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यांच्या कार्याचा गौरवपूर्ण केले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे जळकोट तालुका अध्यक्ष तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मारुतीराव पांडे हे होते. आपल्या मनोगतात त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात विकास कामांना दिलेले योगदान अधोरेखित केले
ग्रामीण विकास,शेती,शिक्षण सामान्य जनतेच्या प्रश्नाबाबत त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर मा. जिल्हा परिषद सदस्य बाबुराव जाधव पंचायत समितीचे उपसभापती प्रा.माधव वाघमारे युवक काँग्रेसचे जळकोट तालुका अध्यक्ष धनराज पाटील नगरपंचायत सभापती संग्राम नामवाड परिवहन अध्यक्ष हवगी स्वामी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संभाजी कोसंबे माजी पंचायत समिती सभापती व्यंकटराव केंद्रे चेअरमन संघटनेचे जळकोट तालुका अध्यक्ष वैजनाथ चव्हाण मा.कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य मंगेश हुंडेकर गौंड पाटील शिंदगीकर बालाजीराव पाटील हळदवाढवणकर सरपंच मुकुंद पाटील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
