Breaking Ticker

शहादा महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी अंतर्गत व्याख्यान संपन्न



शहादा:      पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनी (स्टाफ अकॅडमी) अंतर्गत प्राध्यापक डॉ.आर एस माळी व प्रा. डॉ. राहुल व्ही. पाटील यांचे व्याख्यान संपन्न झाले.

महाविद्यालयात सेवारत प्राध्यापकांनी वाचन ,लेखन, चिंतन करत राहावे व त्यातून विद्यार्थ्यांच्या व देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा मार्ग शोधावा या साठी प्राध्यापक प्रबोधिनीची स्थापना करण्यात आली आहे. प्रबोधिनीच्या माध्यमातून वर्षभर प्राध्यापकांसाठी अनेक विचारोत्तेजक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. या कार्यक्रमा अंतर्गत प्राध्यापक डॉ.आर. एस. माळी यांचे एका इंग्रजी कादंबरीचा परिचय या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. आपल्या व्याख्यानात त्यांनी जॉर्ज ओरवेल यांची ॲनिमल फार्म या कादंबरीचा विस्तृत परिचय करून दिला. ॲनिमल फॉर्म  ही  एक रूपात्मक कादंबरी आहे . यात एकाधिकारशाही व हुकूमशाही विरुद्ध सर्व प्राणी बंड करतात व लोकशाही मार्गाने वाटचाल करतात. ऑल आर इक्वल  (All are Equal) हा त्यांचा नारा असतो .परंतु त्यांच्यातीलच काही नेते बनतात व इतर प्राण्यांचा छळ करतात. डॉ. राहुल व्हि.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील वृक्षतोड व शेतीचे बदलते स्वरूप या विषयावर विस्तृत विवेचन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एस.डी. सिंदखेडकर होते. समारोपात प्रा.डॉ. गौतम कुवर यांनी दोन्ही वक्त्यांच्या विवेचनाचा उहापोह मांडत प्राध्यापक प्रबोधिनीच्या या उपक्रमाचे महत्त्व प्रतिपादित केले.

सूत्रसंचालन व आभार प्रकटन प्राध्यापक प्रबोधिनीचे सचिव प्रा. एस. एस. पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. व्हि. ओ. शर्मा,प्रा. डॉ.एस. आर. उजगरे, प्रा. विजया के.पाटील, प्रा.डॉ. वजीह अशहर यांनी विशेष परिश्रम घेतले.

संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, समन्वयक मकरंद पाटील, प्राचार्य डॉ. एम. के. पटेल यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत व्याख्यान देणाऱ्या प्राध्यापकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.