शहादा - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने "आत्मनिर्भर युवती अभियान" अंतर्गत शहादा पोलीस स्टेशन येथे क्षेत्रभेट दिली. कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव अंतर्गत फक्त विद्यार्थिनींना त्यांचे व्यक्तिमत्व आणि स्वावलंबन विकसित करण्यासाठी सायबर-गुन्हेगारी जागरूकता, बँक व्यवहार जागरूकता, कृषी जागृती, आरोग्य जागरूकता, स्वयंरोजगार योजना अशा विविध मार्गांनी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करते.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२२ - २३ पासून विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत आत्मनिर्भर युवती अभियान योजना सुरू केली आहे. या चालू शैक्षणिक वर्ष २०२५ -२६ मध्ये कार्यक्रमाचा एक भाग म्हणून महाविद्यालयातील विद्यार्थीनींनी विषयी सायबर गुन्ह्यांविषयी शहादा पोलिस स्टेशनला भेट दिली. यावेळी शहादा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण सूर्यवंशी, पोलीस पाटील युवराज पाटील, प्राचार्य डॉ एस.पी.पवार उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी मार्गदर्शन करतांना विद्यार्थीनी सांगितले की, सध्या सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होत असून सोशल मीडियाचा वापर जपून व व्यवस्थित करावा तसेच सध्या याचा गैरवापर करून सर्व फसवणूक ही होत आहे. त्यासाठी सायबर
