शहादा- चिमण्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने शहादा येथे साने गुरुजी मित्रमांडळा तर्फे चिमण्यांना थंडगार पाणी व वृक्षांना घरटे लावून अंतर्राष्ट्रीय चिमणी दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमांचे अध्यक्ष भुलतज्ञ डॉ राजेश जैन होते तर प्रमुख पाहुणे स्री रोग तज्ञ डॉ स्मिता जैन, जनरल फिजिशियन डॉ विवेक नगीन पाटील , साने गुरुजी मित्र मंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी सचिव गुलाबराव पवार, संस्कृती चौधरी, स्वाती पाटील आदी उपस्थित होते यावेळी डॉ विवेक पाटील म्हणाले की
उन्हाळ्यात चिमण्यांचा जीव पाणी कासावीस होतो म्हणून मातीच्या भांड्यात थंडगार पाणी ठेवने खुप गरजेचे आहे. या कार्यक्रमात डॉ स्मिता जैन म्हणाल्या की सद्या कौलारु घर व वृक्षांची संख्या कमी झाली त्याचाही परिणाम चिमण्यांवर झाला अन्यथा पुर्वी कौलारु घर आणि वृक्षांची सांख्या खुप होती तर चिमण्याही खुप होत्या.
माणक चौधरी म्हणाले की चिमण्या ह्या शेतकऱ्यांचा मित्र आहे त्या पिकांवरील कीटक खाऊन शेतकऱ्यांना मदत करतात पण दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असुन त्यातुन निघणारा धुर, मोबाईल चे टॉवर या मुळेही चिमण्यांची संख्या कमी होत आहे त्यांची संख्या वाढण्याची साठी वृक्ष लागवड कृत्रिम घरटे बनऊन लावणे व मातीच्या भांड्यात थंडगार पाणी उन्हाळयात ठेवणे गरचेचे आहे. यावेळी जायन्टसच्या स्वाती पाटील, आशा चौधरी आदी उपस्थित होते.शेवटी गुलाबराव पवार यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सदास्यानी परिश्रम घेतले.
