Breaking Ticker

शहाद्यात विश्वगुरु महात्मा बसवेश्र्वरांची 895 वी जयंती उत्साहात साजरी


             

  प्रतिनिधी शहादा 

       येथे आधुनिक भारतीय समाजाच्या स्वप्नाची मुहर्तमेढ रचणारे विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांची ८९५ व्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकातील सांगितलेले भविष्यवेधी विचार यामध्ये अनुभम मंटपम, कायाकवे कैलास, विश्वगुरु, प्रखर राष्ट्रप्रेम, स्त्री-पुरूष समान अधिकार इत्यादी विचार पुढील पिढीला कळावेत व त्याचे योगदान देशहितासाठी व्हावे या उद्देशाने शिक्षक मित्रमंडळ शहादा यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

       या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून साने गुरुजी मित्र मंडळ शहादा चे अध्यक्ष  श्री. माणकभाई चौधरी हे लाभले होते तर या प्रसंगी श्री. तुकाराम आलट सर, शिवराज मिरजगावे सर, विशाल शिसोदे सर, मन्मथ बर्डे सर, विठ्ठल कुरे सर, श्रीमती जयश्री उरगुंडे मॅडम, कु.काव्या अलट आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. सदर कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सन्मान अर्णव प्रदीप दरेकर, Ctet परीक्षेत व Blo कामात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल  शिवराज मिरजगावे, Tet /Ctet पास शिक्षक मन्मथ बरडे, शक्ती धनके, बालाजी वाडीकर यांचा सन्मान करण्यात आला 

          अध्यक्ष श्री. माणकभाई चौधरी यांनी महात्मा बसवेश्र्वरांच्या जीवनातील प्रेरणादायी विचारावर प्रकाश टाकून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश कुमार नागलगावे , संजय बेद्रे, संदीप म्हमाने, प्रदीप दरेकर,जाधवर सर व शिक्षक मित्र मंडळी यांनी मेहनत घेतली सूत्रसंचालन - लक्ष्मीपुत्र उप्पीन आभार - शक्ती धनके यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.