शहादा - पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, शहादा येथे मेगा पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखती) चे आयोजन करण्यात आले होते. सदर कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी दमण येथील नामांकित मॅक्लॉइड्स फार्मासुटीकल कंपनीचे अधिकारी पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) घेण्यासाठी आले होते. त्यात कंपनीचे उपव्यवस्थापक राजकुमार, एचआर हिरेन पटेल यांनी इंटरव्ह्यू घेतले. सदर कंपनीत प्रोडक्शन, क्वालिटी कंट्रोल, क्वालिटी अशुरन्स, फर्मेंटेशन इंजीनियरिंग, स्टोर, वाटर सिस्टम, एचवीएस सिस्टम ह्या विभागांसाठी विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेण्यात आली असून नोकरीचे ठिकाण कळविण्यात येणार आहे. सदर पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) मध्ये सामान्य अभियोग्यता चाचणी आणि या प्रक्रियेनंतर निवडक विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांची निवड प्रक्रिया पार पडली. सदर पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एकूण १७० पेक्षा जास्त विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी एकूण ७० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना त्याबाबतचे पत्र देण्यात आले आहे. या पूल कॅम्पस इंटरव्ह्यू (प्रत्यक्ष मुलाखत) मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे चांगले व उत्तम पॅकेज दिले जाणार आहे. सदर कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील, उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील, मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील, शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्रा.मकरंदभाई पाटील, मंडळाचे संचालक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा.डॉ.जवेश पाटील, प्रा.समीर शेख, प्रा.अमित धनकानी व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
कॅम्पस प्लेसमेंट ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीची आणि संस्थेच्या गुणवत्तेची पावती व प्रतिक आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्था नेहमीच कटिबद्ध आहे. संस्थेतर्फे नेहमीच परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या, शेतकरी कुटुंबातील मुला - मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी परिसरातील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून त्यांना नोकरीसाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागणार नाही ह्या दृष्टीने, उद्देशाने दरवर्षी नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचे कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात येत असते व यावर्षीही चांगला प्रतिसाद मिळाला तसेच विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असते. कॅम्पस प्लेसमेंटमुळे विद्यार्थ्यांना थेट उद्योगविश्वात प्रवेश मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे.”(बापूसाहेब दीपकभाई पाटील - अध्यक्ष - पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, शहादा)
