फुलचंद लोढा अध्यक्षपदी, किशोरकुमार चोरडिया मंत्रीपदी बिनविरोध निवड
शहादा (प्रतिनिधी) – शहादा येथील साधूमार्गी जैन श्री संघाच्या सन २०२६ ते २०२८ या कार्यकाळासाठी नवीन कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदी श्री. फुलचंद किसनलाल लोढा यांची तर मंत्रीपदी श्री. किशोरकुमार जमनालाल चोरडिया यांची एकमताने निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी माजी अध्यक्ष श्री. प्रकाशचंद मिश्रीलाल कोटडिया तसेच माजी मंत्री श्री. उत्तमचंदजी नेमीचंदजी चोरडिया यांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून आपला पदभार औपचारिकरित्या नवनिर्वाचित अध्यक्ष व मंत्री यांच्याकडे सोपविला. उपस्थित समाजबांधवांनी नव्या कार्यकारिणीवर विश्वास व्यक्त करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
🌼 नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे —
अध्यक्ष : श्री. फुलचंद किसनलाल लोढा
उपाध्यक्ष : श्री. सुरेशचंद सोनराज कोटडिया, श्री. राजेंद्रकुमार पारसमल कोटडिया
मंत्री : श्री. किशोरकुमार जमनालाल चोरडिया
सहमंत्री : श्री. चंदनमल मोहनलाल चोरडिया
कोषाध्यक्ष : श्री. रमेशचंद देवीचंद ओस्तवाल
प्रतिक्रमण संयोजक : श्री. शांतीलाल उत्तमचंद चोपडा
📌 विविध संयोजकांची निवड
दानपेटी संयोजक :
श्री. आनंदकुमार मूलचंद चोरडिया, श्री. चंद्रकांत राणूलाल कोटडिया,
श्री. पारसमल अमरचंद चोरडिया, श्री. रमेशचंद जसराज चोरडिया,
श्री. गिरीशकुमार मोतीलाल कोटडिया, श्री. प्रमोदकुमार पन्नालाल चोपडा,
श्री. नीलम बनेचंद बोथरा
विहार संयोजक :
श्री. राहुलकुमार उत्तमचंद कोटडिया, श्री. युगलकुमार आनंदमल कोटडिया
दानपेटी संयोजक (विशेष) :
श्री. विशांतकुमार दिलीपचंद कोटडिया
सामाजिक संयोजक :
श्री. प्रदीप रमेशचंद देसरडा, श्री. उमेश उत्तमचंद ओस्तवाल
समता शाखा संयोजक, समता युवा संघ व बालिका मंडळ परीक्षा संयोजकांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.
🌸 विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबविणार
नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून पुढील काळात समाजहिताचे विविध धार्मिक व सेवाभावी उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यामध्ये —
चातुर्मास व्यवस्था
साधू-संतांच्या विहार सेवा व्यवस्था
भगवान महावीर स्वामीजी यांचा जन्मकल्याणक महोत्सव
आचार्य रामलालजी म. सा. यांच्या जन्मोत्सवानिमित्त गरजूंसाठी मोफत अन्नदान
तसेच विविध सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी कार्यक्रम
नवीन पदाधिकाऱ्यांनी संघाची परंपरा, संस्कार व धार्मिक कार्य अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.
