शहादा प्रतिनिधी
भगवान महावीर स्वामीजी यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त मंगळवार, दिनांक 31 मार्च 2026 रोजी शहादा नगरीत भक्ती, सेवा आणि एकतेच्या वातावरणात विविध धार्मिक व सेवाभावी कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. श्री जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघ, शहादा तसेच सकल संघ शहादा यांच्या वतीने आयोजित या महोत्सवात महिला, पुरुष, युवक, युवती, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सकाळी 8.30 वाजता कुंथुनाथजी जैन मंदिर येथून भगवान महावीर स्वामीजींच्या जयघोषात भव्य वरघोडा काढण्यात आला. “जय जिनेंद्र… जय महावीर…” च्या मंगल घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. यावेळी पुरुषांनी पांढरा कुर्ता तर महिलांनी लाल चूंदडी परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
त्यानंतर समता भवन येथे सकाळी 11 वाजता अन्नदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमातून अनेक गरजू बांधवांना अन्नदान करण्यात आले. तसेच दादावाडी येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत रक्तदान शिबिर पार पडले. समाजातील युवक-युवती व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान करून मानवसेवेचा संदेश दिला. दादावाडी डोम येथे सकाळी 11.30 वाजल्यापासून नवकारसी (भोजन) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी सर्व समाजबांधवांनी सहपरिवार उपस्थित राहून धर्म, एकता आणि सेवाभावाचा सुंदर अनुभव घेतला.
विशेष म्हणजे ज्ञानगच्छाधिपती श्रुतधर पंडितरत्न परमपूज्य गुरुदेव 1008 श्री प्रकाशचंदजी म.सा. यांच्या आज्ञानुवर्तीनी प.पू. रचनाजी म.सा. आदि ठाणा-7 यांचे महावीर भवन येथे सुखसातापूर्वक विराजमान असणे ही शहादा जैन समाजासाठी आनंदाची बाब ठरली. या पावन सानिध्यात “एक सामायिक भगवान महावीरस्वामी के नाम” या भावनेतून सामूहिक सामायिक व प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. भगवान महावीर स्वामीजींच्या जन्म कल्याणक दिनाचे औचित्य साधत सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मलाभ घेतला.
या भव्य महोत्सवात संघ अध्यक्ष विजयकुमार चोपडा, पूर्व अध्यक्ष कचरुलाल नाहटा, पूर्व अध्यक्ष सुमतीलाल खिवसरा, लाभचंद गेलडा, तेरापंथ सभा अध्यक्ष कैलास संचेती, वर्धमान स्थानकवासी जैन श्री संघ अध्यक्ष अॅड. प्रदीप टाटिया, सेक्रेटरी निखिल साबद्रा, साधुमार्गी जैन श्री संघ अध्यक्ष फुलचंद लोढा, मंत्री किशोर चोरडिया, प्रमोद चोपडा, भरत ओस्तवाल, नवनिर्वाचित नगरसेवक ललित छाजेड, विनयचंद गांधी, महावीर छाजेड, जितेंद्र छाजेड, राजेश नाहटा, बाबूसेठ बागरेचा, सोशल ग्रुप अध्यक्ष नंदकिशोर चोरडिया, डॉ. राजेश जैन, मयूर कुचेरिया, आशिष छाजेड, पीयूष ललवाणी, श्री महावीर पतपेढीचे संस्थापक अध्यक्ष रमेशचंद्र चोरडिया, श्री तुलसी पतसंस्थेचे चेअरमन पारसमल कुचेरिया, पापसेठ नाहटा, संजय नाहटा, गुड्डूशेठ नाहटा, सुनील कोटडिया, महावीर पतपेढीचे मॅनेजर मोतीलाल चोरडिया,जयप्रकाश कोचर ,केयूप अध्यक्ष धीरज नाहटा , केयूप पूर्व अध्यक्ष प्रवीण लूनिया ,यश कोचर , धीरज चोपड़ा , संकेत बाफना , योगेश लूनिया , श्रीपाल लुनिया
सामाजिक कार्यकर्ते भवरलाल जैन यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर, महिला-पुरुष व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भगवान महावीर स्वामीजींच्या जन्म कल्याणकानिमित्त आयोजित या महोत्सवाने शहादा नगरीत धर्म, सेवा, संस्कार, समता आणि समाजएकतेचा सुंदर संदेश दिला. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
